Breaking News

आदेशाला २४ तास उलटत नाही तोच ईडीची पुन्हा हसन मुश्रीफांवर धाडः चौकशीला सोमवारी या दिड महिन्यात दुसऱ्यांदा ईडीची कारवाई

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार केली की ईडीची कारवाई होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांचीच न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर २४ तास उलटण्याच्या आधीच ईडीने दिड महिन्यात दुसऱ्यांचा हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी छापेमारी केली. तब्बल नऊ तास मुश्रीफ यांना सोमवारी चौकशीसाठी ईडीने चौकशीसाठी कार्यालयात बोलाविल्याची माहिती पुढे आली आहे.

आज सकाळी सातच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या निवासस्थाना बाहेर जमा झाले. तसेच भाजपा आणि ईडीच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. तर काही कार्यकर्त्यांनी ईडी कारवाईच्या विरोधात भिंतीवर डोके आदळून स्वतःला जखमी करून घेतले.
त्यानंतर मुश्रीफ यांच्या पत्नीने बाहेर जमलेल्या कार्यकर्त्ये आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशीं बोलताना फारच उद्विव्गन होत आम्हाला गोळ्या घालून जावा आम्हाला संपवून टाका असे संतप्त विधान केले.

संध्याकाळी ७ च्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपला तपास पूर्ण केल्यानंतर संध्याकाळी घराबाहेर पडताना मुश्रीफांच्या घराबाहेर जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी बळाचा वापर सुरु केल्यानंतर कार्यकर्त्ये पांगले आणि त्यानंतर ईडीचे अधिकारी मार्गस्थ झाल्याचे दिसून आले.

Check Also

लोकसभा निवडणुकीच्या ६ व्या टप्प्यातील ३९% उमेदवार कोट्यधीश

सध्या देशात लोकसभा निवडणूका पार पडत आहे. या लोकसभा निवडणूकीसाठी आतापर्यंत चार टप्पे पार पडले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *