Breaking News

कान्हेरी लेण्यांच्या सौंदर्यावर जी- 20 देशांचे प्रतिनिधी भारावले कान्हेरी लेण्यांना भेट देवून या स्थळांची माहिती व इतिहास जाणून घेतला

कान्हेरी लेण्यांचे अप्रतिम सौंदर्य, नीरव शांतता आणि निसर्गरम्य परिसर पाहून जी- 20 देशांचे प्रतिनिधीं भारावले. जी-20 देशांच्या प्रतिनिधींची १३ ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये मुंबईत परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या शेवटच्या दिवशी जी-20 प्रतिनिधींसाठी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील प्रसिद्ध कान्हेरी लेण्यांना भेट देवून या स्थळांची माहिती व इतिहास जाणून घेतला.

बोरीवली जवळील साष्टी बेटाच्या अरण्यात कान्हेरी लेणी आहेत. या लेण्यांचा इतिहास, ‘कान्हेरी’ या शब्दाचा उगम कशा प्रकारे झाला. या लेण्यांतून भारताच्या बुद्धकाळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते. हा परिसर अत्यंत शांत आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा आहे त्यामुळे या भागात अनेक पर्यटक भेट देत असतात अशी माहिती केंद्रीय पुरातत्व विभागाने यावेळी जी-20 च्या प्रतिनिधींना दिली.

या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्खूंसाठी विहार, सभागृह, खोल्या. बुद्ध आणि अवलोकितेश्वर यांच्या मूर्ती, डोंगर माथ्यावर पाण्याची टाकी यावेळी सर्वांनी पहिल्या. गुंफा पूर्ण झाली की त्यांचे परिवर्तन विहारामध्ये होई आणि तेथे बौद्ध धर्मीय विविध उपक्रम राबवत. बहुतेक गुंफांचा वापर बौद्धधर्मीय श्रमण यांना राहण्यासाठी, अभ्यासासाठी आणि ध्यानासाठी करीत. मोठ्या गुंफामधून परिषदा भरविल्या जातात. तसेच तेथे स्तूप आहेत त्यामुळे तेथे प्रार्थना करण्यासाठीही त्यांचा वापर केला जाई. बौद्ध संघातील जीवनात काय हवे आहे, याबद्दलचे मार्गदर्शन बहुतेक विहारातील मठाधीश देत असत, अशा अनेक ऐतिहासिक घटनांना उजाळा देत कान्हेरी गुंफाच्या निर्मितीपासूनचा इतिहास परिषदेतील प्रतिनिधींना देण्यात आली.
सुवाच्य अक्षरातील शिलालेख आणि वचननामे (एपिग्राफ्स) ही ब्राह्मी, देवनागरी आणि पहलवी या तीन लिप्यांत आहेत. येथे अनेक लहानमोठे धबधबे आहेत, सध्या रिकामे ओहोळ पूर्ण कोरडे आहेत. मात्र पाण्याचा प्रवाह किती मोठा असू शकतो याच्या खुणा येथे लक्षात येतात. संजय गांधी राष्ट्रीय पार्कचे मुख्य गेट ते कान्हेरी गुंफा हा रस्ता एका नदी पात्राने विभागलेला आहे. हा परिसर पावसाळ्यात अत्यंत सुंदर दिसतो.

जगभरातील प्रतिनिधींनी भारतीय शास्त्रीय संगीताचा घेतला आस्वाद
तुळशी तलाव येथे वन विभागाच्या निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी केंद्रीय पर्यटन विभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तबला वादन, पखवाल वादन आणि शास्त्रीय संगीत सहभागी कलाकारांनी सादर केले. बासरी वादक देबो प्रिया,सुश्मिता चॅटर्जी, कलिनाथ मिश्रा आणि मृणाल मिश्रा यांनी भारतीय संस्कृतीतील विविध सुप्रसिद्ध गाण्यांवरती बासरी वादन केले.

Check Also

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊ या, मतदानासाठी या आहेत सुविधा ….

लोकसभा निवडणूक २०२४ साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *