Breaking News

भारत जोडो यात्रेत आदिवासी कष्टकरी महिलांचा सहभाग

आदिवासी हे देशाचे मालक आहेत पण त्यांचे मालकी हक्क मिळू नयेत ते आदिवासी नाही तर कायम जंगलातच रहावेत म्हणून त्यांना वनवासी संबोधून त्यांची खरी ओळख पुसण्याचे काम भाजपा करत आहे. आदिवासी हे काँग्रेससाठी आदिवासी आहेत आणि आदिवासीच राहतील. जल जंगल जमीन चा अधिकार तर तुम्हाला मिळालाच पाहिजे पण त्याबरोबर शिक्षण व आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत, असे खा. राहुल गांधी म्हणाले.

जळगाव जामोद मध्ये हजारो आदिवासी कष्टकरी महिला मेळाव्यात ते बोलत होते. राहुल गांधी पुढे म्हणाले की, आदिवासींची संस्कृती, इतिहास देशासाठी महत्वाचा आहे, पर्यावरणशी तुमचे नाते घट्ट आहे आणि ते महत्वाचे आहे. आदिवासींची भाषा, कपडे व जगण्याचा अंदाज वेगळा आहे पण तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाहीत, आपल्यातीलच आहेत. काँग्रेसने आदिवासींसाठी पेसा कायदा, वन हक्क कायदा दिला पण ती काही तुम्हाला भेट दिलेली नाही तर तो तुमचा हक्क आहे, अधिकारच आहे. तुमचा हक्क आहे तोच काँग्रेस सरकारने तुम्हाला दिला. या जमिनीवर पहिले पाऊल आदिवासींनी टाकले पण पंतप्रधान आदिवासींसाठी नवा शब्द वनवासी उच्चारतात.. आदिवासी व वनवासी या दोन शब्दांचा अर्थ वेगळा आहे. आदिवासी मालक आहेत तर वनवासी म्हणजे जंगलमध्ये राहणारा म्हणजेच शहरात राहू न शकणारा, शिक्षण न मिळू शकणारे, जंगल संपले तर तुमचे अस्तित्वही संपेल आणि पंतप्रधान तुमच्या हक्काचे जंगल काही उद्योगपतींना देत आहेत. तुमच्या अस्तित्वावर घाला घातला जात आहे.

काँग्रेस पक्षाने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण देऊन राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व दिले. महिला, आदिवासी, दलित, वंचित समाज घटकाला न्याय देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. भाजपाचा मुली, महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बलात्काराला मुलींचे कपडे जबाबदार असल्याचे सांगत मुलींनाच चूक ठरवले जाते. बलात्कार कपड्यामुळे होत नाहीत त्यात मुलीची चुक नसते जर कोणी गुन्हेगार असेल तर तो बलात्कारी.. भाजपावाले महिलांचा सन्मान न करता त्यांचा अपमान करतात.

या मेळाव्याला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री खा. दिग्विजयसिंह, महिला काँग्रेस अध्यक्ष नेट्टा डिसुजा, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, योगेंद्र यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *