Breaking News

अजित पवार म्हणाले, मी संविधान, कायदा मानणारा… मी संविधान, कायदा मानणारा त्यामुळे जे कुणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी

राज्यात सत्ताबदल होताच पुन्हा एकदा शिखर बँकेतील आर्थिक घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचे वृत्त पुढे आले. विशेष म्हणजे शिखर बँकेच्या संचालक मंडळावर ७५ जण होते. या सर्वांची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मी एक या देशाचा नागरिक आहे. मी संविधान, कायदा मानणारा आहे. त्यामुळे माझी जे कुणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी असल्याचे स्पष्ट केले.

माझ्या चौकशीच्या बातम्या प्रसार माध्यमातूनच मला कळाली आहे. मात्र माझ्यासोबत ७५ जणांची नावे कधी पुढे येत नाहीत. फक्त अजित पवार आणि बँकेचे नाव एवढेच पुढे येते. तसेच माझ्या नावाचा मोठा फोटो आणि हेडलाईन होते. परंतु आता राज्यात त्यांचे सरकार आहे. त्यामुळे काय चौकशी करायची करा असे आव्हानही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले.

हे प्रकरण २०१२ पासूनचे आहे. प्रत्येकवेळी अजित पवारांचे नांव येते. अजित पवार आणि ७५ लोक मात्र त्या ७५ लोकांची नांवे येत नाही फक्त अजित पवार यांचे नाव, फोटो, हेडलाईन होते. माझी चौकशी सर्वात आधी सहकार विभागामार्फत, निवृत्त न्यायाधीशांमार्फत, सीआयडी, एसीबी आणि आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने केली मात्र आता आर्थिक गुन्हा अन्वेषण विभाग चौकशी करणार अशी पुन्हा बातमी कानावर आली आणि तुमच्या माध्यमातून वाचली, पाहिली. परंतु याबाबत मला माहिती नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी द्यायला तयार असल्याची तयारीही त्यांनी यावेळी दाखविली.

Check Also

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *