Breaking News

शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर राणाच्या फोटोसेशनवरून आरोग्य मंत्री म्हणाले… रूग्णालयात असे करणे किंवा जाणीवपूर्वक करणे चुकीचे

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी तुरूंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर स्वतःची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात दाखल झाल्या. मात्र रूग्णालयात असताना नवनीत राणा यांनी त्यांच्यासोबत तेथे घडत असलेल्या अनेक गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करत लोकांमधून सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न केला.
मात्र राणा यांनी व्हायरल केलेल्या काही फोटोंबाबत शिवसेनेने आक्षेप घेत त्याचा जाब विचारण्यासाठी थेट लीलावती रूग्णालयाच्या प्रशासनाला धारेवर धरले. तसेच लीलावती रूग्णालयाच्या विरोधात पोलिसांमध्ये आज तक्रारही दाखल केली. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात केलेल्या फोटो सेशनवर प्रतिक्रिया दिलीय. रुग्णालयातील एमआरआय (MRI) विभागात फोटो काढणाऱ्यांवर काय कारवाई करणार? असा प्रश्न विचारला असता राजेश टोपे यांनी आतापर्यंत अशाप्रकारे सीटी स्कॅन किंवा एमआरआय (MRI) काढताना फोटो सेशन करणं कोठेही पाहिलेलं नाही, असं मत व्यक्त केलं. ते पिंपरी चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मी आरोग्यमंत्री आहे, मात्र आतापर्यंत अशाप्रकारे सीटी स्कॅन किंवा एमआरआय (MRI) काढताना फोटो सेशन करणं कोठेही पाहिलेलं नाही. लीलावती रुग्णलयात ज्या पद्धतीने फोटो काढण्यात आलेत ते रुग्णालयाच्या दृष्टीने फार चुकीचं आहे. तसेच रुग्णालयाला अंधारात ठेऊन दुसरं कोणी फोटो सेशन केलं असेल तर तेही चुकीचं असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
टीआरपी वाढवण्यासाठी अशा गोष्टी करू नयेत. काही कायदेशीर बाबी/नियम असतात त्याचं पालन झालं पाहिजे. कोणी आजारी असेल तर ते सार्वजनिकपणे इतरांना सांगण्याची गरज नाही. त्या व्यक्तीची तपासण व्हायला हवी, आजारी असल्यास त्याच्यावर उपचार केले पाहिजेत. मात्र, त्यात राजकारण करण्याचं काम करू नये. ही चुकीची पद्धत असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *