Breaking News

पेगॅसिस प्रकरणावरून भाजपा खासदारानेच केला मोदींवर आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला घरचा आहेर

मराठी ई-बातम्या टीम

अमेरिकेतील द न्युयॉर्क टाईम्स वर्तमानपत्राने पेगॅसिस प्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्त्राईलचे पंतप्रधान पंतप्रधान बेजामिन नेत्यानाहू यांच्यात झालेल्या शस्त्रास्त्र खरेदीत पेगॅसिस सॉफ्टवेअरची खरेदी करण्याचा निर्णय झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आणल्यानंतर भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत या स्पायवेअर प्रकरणी न्यायालय आणि संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

तसेच द न्युयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्ताचे भारत सरकारने खंडण केले पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मोदी सरकारने इस्राईलच्या एनएसओ कंपनीकडून हेरगिरी करणारं पेगसेस स्पायवेअर खरेदी केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि संसदेची दिशाभूल केली आहे.

मोदी सरकारने करदात्यांच्या पैशातून ३०० कोटी रुपये खर्च करून खरोखर इस्राईलच्या एनएसओ कंपनीचं पेगसेस स्पायवेअर खरेदी केलंय या न्यूयॉर्क टाईम्सच्या खुलाशांचं मोदी सरकारने खंडन केलं पाहिजे. प्रथमदृष्ट्या मोदी सरकारने पेगसेस प्रकरणी आपल्या सर्वोच्च न्यायालय आणि संसदेची दिशाभूल केल्याचे दिसतय असे ट्विट करत त्यापुढे ‘वॉटरगेट’?” असे लिहून जगभरात गाजलेल्या वॉटरगेट प्रकरणाचा संदर्भ देत स्पायवेअर खरेदीतही मोठा घोटाळा असल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष सूचित केले.

द न्युयॉर्क टाईन्सने प्रकाशित केलेल्या वृत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै २०१७ मध्ये इस्राईल दौऱ्यावर गेले तेव्हा भारताने इस्राईलसोबत २ बिलियनचा शस्त्रास्त्र करार केला. यात क्षेपणास्त्र यंत्रणेसह पेगसेस स्पायवेअरचा देखील समावेश असल्याचा गौप्यस्फोट केला.  विशेष म्हणजे इस्राईलला भेट देणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते. भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवर विशिष्ट पॅलेस्टाईनसंदर्भात धोरण असूनही ही भेट झाली होती.

या इस्राईल दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन इस्राईल पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात २ बिलियनच्या शस्त्रस्त्र खरेदीचा करार झाला. यातच क्षेपणास्त्र यंत्रणेसोबत पेगसेसचा समावेश होता. यानंतर नेत्यान्याहू यांनी जून २०१९ मध्ये भारत दौरा केला. यानंतर भारताने संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत पॅलेस्टाईन मानवाधिकार संघटनेच्या मान्यतेवर इस्राईलच्या बाजूने मतदान केल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *