Breaking News

दरमहा २५८२ रुपयांच्या बचतीवर मिळतील १ कोटी जाणून घ्या एलआयसीची खास पॉलिसी

मुंबई: प्रतिनिधी

कमी जोखीम असलेल्या आणि सुरक्षित पर्यांयांमध्ये गुंतवणूक करण्याकडे सर्वांचाच कल असतो. यामध्ये एलआयसीच्या गुंतवणूक योजनांना अनेकांकडून प्राधान्य दिलं जातं. जीवन उमंग पॉलिसी ही एलआयसीची अशीच एक जोखीम नसलेली योजना.एलआयसीच्या जीवन उमंग पॉलिसीमध्ये विमा संरक्षणाचा लाभ पॉलिसीधारक जिवंत असे पर्यंत चालू राहतो. या पॉलिसीमध्ये तुम्ही दर महिना २५८२ रुपयांची गुंतवणूक करुन १ कोटी रुपयांपर्यंत रिटर्न मिळवू शकता.

ही पॉलिसी घेताना विमाधारक विमा रक्कम आणि प्रीमियम पेमेंट टर्म निवडतो.पॉलिसीच्या प्रीमियम पेमेंटची मुदत संपताच, विमाधारकाला वार्षिक पेन्शन म्हणून विमा रकमेच्या ८ टक्के रक्कम मिळते. ही पेन्शन संपूर्ण आयुष्यासाठी उपलब्ध आहे. जेव्हा पॉलिसीधारक वयाची १०० वर्षे पूर्ण करतो तेव्हा पेन्शन थांबते आणि पॉलिसी मॅच्युअर होते. पॉलिसी दरम्यान ज्यांना पेन्शन घ्यायची आहे आणि त्यांच्यानंतर कुटुंबाला मोठी रक्कम द्यायची आहे अशा लोकांसाठी ही पॉलिसी खास आहे. ही एक मर्यादित प्रीमियम पेमेंट योजना आहे. यामध्ये पॉलिसीधारकाला निवडलेल्या पॉलिसी मुदतीपेक्षा कमी दराने प्रीमियम भरावा लागतो. या पॉलिसीमध्ये विमाधारकाला वेस्टेड रिव्हिजनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस मिळतो.

एलआयसीची जीवन उमंग ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या पॉलिसींपैकी एक आहे. जीवन उमंग पॉलिसी १५, २०,२५ आणि ३० वर्षासाठी घेता येते. ९० दिवस ते ५५ वर्षांपर्यंत वयाच्या लोकांना ही पॉलिसी घेता येते. म्हणजेच, जर एखादे मूल ९० दिवसांचे असेल, तर तुम्ही त्याच्या नावाने जीवन उमंग पॉलिसी खरेदी करू शकता. विमाधारकाचे वय १०० वर्षे झाल्यावर या पॉलिसीची रक्कम मिळते. कमीत कमी २ लाख रुपयांची पॉलिसी घ्यावी लागते. जास्तीत जास्त विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.

या पॉलिसी अंतर्गत मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक हप्ते भरता येतात. २ वर्ष प्रीमियम  भरल्यानंतर तुम्ही त्यावर कर्जही घेऊ शकता. कर्जाची रक्कम पॉलिसी किती वर्षे चालली आहे आणि प्रीमियम भरला आहे यावर अवलंबून आहे. या पॉलिसीमध्ये प्रीमियम  माफी लाभ रायडर आहे जो आपल्या मुलासाठी घेतला पाहिजे. प्रीमियम भरणा करणारा जर अकाली जग सोडून गेला, तर मुलाला प्रीमियम माफी रायडरचा लाभ मिळतो आणि त्याचे संपूर्ण प्रीमियम माफ केले जाते.

Check Also

एसबीआयमध्ये १२ हजार फ्रेशर्सना संधी ८५ टक्के आयटी क्षेत्रातील नवतरूणांना प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून नियुक्त्या

एसबीआय SBI, देशातील सर्वात मोठी असलेल्या बँकेत, FY25 मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि सहयोगी म्हणून १२,००० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *