Breaking News

मुंबईत राहणार नाईट कर्फ्यू महानगरपालिकेकडून ट्विटद्वारे माहिती

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात रात्रीची जमाव बंदी आदेश उद्यापासून रविवारपासून लागू होत आहे. मात्र मुंबईत आज ६ हजारहून अधिक रूग्ण आढळून आल्याने मुंबईतही जमावबंदीबरोबरच नाईट कर्फ्यु लागू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने ट्विटरवरून दिली.

तसेच रात्रो ८ ते सकाळी ७ वाजेपर्यत सर्व मॉल बंद राहणार असून तशी कल्पना सदर आस्थापनांना देण्यात येणार असल्याचे जाहिर केले.

राज्यात मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक आणि पुणे येथे कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. इतर मंडळाच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यानंतर पुणे, नागपूर आणि नाशिकमध्येही कोरोनाची संख्या दुपट्टीने वाढताना दिसत आहे.

सध्या जरी मुंबईत लॉकडाऊन लागू करण्याचे टाळण्यात आलेले असले तरी पुणे, नाशिक आणि नागपूरात कडक निर्बंधांबरोबरच लॉकडाऊनचे संकेत देण्यात आलेले आहेत. तर औरंगाबाद, नांदेड मध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहेत. तर सोलापूर, नागपूरात वीकएंड लॉकडाऊन जाहिर करण्यात आला.

मुंबईत मागील तीन दिवस ५ हजाराहून अधिक संख्या आढळून आल्यानंतर आज ६ हजाराहून अधिक बाधित आढळून आले आहेत. ही संख्या अशीच चढीच राहिली तर मुंबईत दिवसाही कर्फ्यु लागू करून नंतर लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

आशिष शेलार यांची टीका, उद्धव ठाकरे वोट जिहादचे आका

इंडी आघाडीकडून एक नवीन पद्धतीचा जिहाद सुरू झाला आहे. पूर्वी आपण लँड जिहाद पाहिला, लव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *