Breaking News

भाजपाने दिले बांग्लादेशी नागरीकाला संघटनेचे अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश भारत तपासे यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी
बांग्लादेशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या रुबेल शेख याला भाजपने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाअध्यक्ष केल्याची माहिती पोलिस धाडीत समोर आली असून भाजपवर बांग्लादेशी तरुणाला पद देण्याची नामुष्की आली आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश भारत तपासे यांनी केली आहे.
दरम्यान भाजपच्या बांग्लादेशी कनेक्शनची चौकशी करण्यात यावी अशी मागणी महेश भारत तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
एकीकडे भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोहीचा ठपका ठेवणारे भाजपाचे कार्यकर्ते आता बांग्लादेशी असल्याचे समोर येत आहेत. बांग्लादेशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या रुबेल जोनू शेख याने खोटी कागदपत्रे तयार केल्याची माहिती पोलिसांनी टाकलेल्या धाडीत समोर आली आहे. याच तरुणाला भाजपने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाध्यक्ष हे पद दिल्याचे समोर आले आहे. या युवकाने तयार केलेली त्याची सर्व कागदपत्रे ही बोगस असल्याचेसुध्दा समोर आली असून देशद्रोहाची भाषा करणारे भाजपाचे नेते मात्र या प्रकरणात गप्प का आहेत असा सवालही त्यांनी केला.
मुंबई व महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक बांधव भाजपला मानत नसून आता त्यांना बांग्लादेशी अल्पसंख्यांकांना पद देण्याची नामुष्की आलेली आहे. बेकायदेशीररित्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणाऱ्या अशा भाजपच्या पदाधिकार्‍यांनी काही समाजविघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भाजप घेणार का? असा प्रश्न त्यांनी केला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *