Breaking News

आता ३१ ऑगस्टपर्यत कर्जथकबाकी वसूलीसाठी तगादा नाही रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांता दास यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक संस्था आणि केंद्रे बंद आहेत. त्यामुळे कर्ज थकबाकीदारांकडे पुढील आणखी तीन महिने तगादा लावू नये असे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांता दास यांनी दिले. तसेच बँकेच्या रेपो रेट मध्ये ०.४ टक्क्याने कपात करण्यात आली सून रिझर्व्ह रेपो रेट मध्ये ३.३५ टक्क्यांची कपात करण्यात आल्याने कर्जही आता स्वस्त दरात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्थिक क्षेत्रे जवळपास सगळीच बंद असल्याने जीडीपीचा दरात घसरण होणार असून दुसऱ्या सहामाहीत महागाईचा दर ४ टक्के पेक्षा कमी राहणार आहे. त्यामुळे बाजार आणि निर्यातील प्रोत्साहन देणाऱ्या उपाय योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१५ हजार कोटींच्या कर्ज वसुलीसाठी ‘सिडबी’ला आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच एक्सपोर्ट क्रेडिट वर्षावरून तीन महिने वाढवून आता सव्वा वर्ष करण्यात आले असून बँकाची एक्सपोजर मर्यादा ३० टक्क्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

परदेशात भारतीय मसाले नाकारण्याचे प्रमाण कमी वाणिज्य मंत्रालयाची माहिती

भारतीय मसाल्यांच्या निर्यातीला जागतिक स्तरावर छाननीचा सामना करावा लागत असल्याने, वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *