Breaking News

मुंबईत गेलात तर कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात परतायचे नाही महानगरपालिकांकडून ८ मे पासून येण्या-जाण्यावर बंदी

मुंबई: प्रतिनिधी
मुंबई महानगरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीही बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यातच आता कल्याण-डोंबिवली आणि उल्हास नगरातही बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईत कामानिमित्त जावून येणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय दोन्ही महापालिकांनी घेतला आहे. ही बंदी ८ मे पासून अंमलात आणण्यात येणार आहे.
मुंबईत कामासाठी जाणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांच्या शासकिय आणि खाजगी कंपन्यांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे कामानिमित्त गेलेल्यांनी त्या सुविधेचा लाभ घेवून तिकडेच रहावे असे आवाहन कल्याण डोबिंवली आणि उल्हासनगर महापालिकेने कर्मचाऱ्यांना केले.
त्यामुळे ८ मे पासून अशा मुंबईहू परत येणाऱ्यांवर बंदी घालण्यात येणार असल्याचे परिपत्रकही काढण्यात आले आहे. तसेच ज्यांना नोकरीच्या निमित्ताने रोज जावे मुंबईत जावे लागते त्यांनी आपली माहिती नाव, पत्ता, कंपनीचे नाव आधार क्रमांक आदी गोष्टी कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेला कळवावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

Check Also

मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान

मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *