Breaking News

Tag Archives: rahul gandhi

नाना पटोले यांची घोषणा, या प्रश्नांसाठी आता काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व वीज बिल माफीसह विविध ठराव एकमताने मंजूर

देशात भाजपा सरकारच्या विरोधात प्रचंड चिड असून शेतकरी, तरुणाई बरबाद करायची व्यवस्था मोदी सरकारची आहे. भाजपा सरकारविरोधात जनतेत संतापाची लाट असून राहुलजी गांधी यांनी मांडलेल्या भूमिकेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेला देशात प्रतिसाद मिळालाच पण महाराष्ट्रानेही अभूतपूर्व प्रतिसाद देऊन ही पदयात्रा यशस्वी केली आहे. आता हाच संदेश …

Read More »

अमित शाह यांनी जाहीर केली राम मंदीराची तारीख राहुल गांधी यांचे नाव घेत त्यांच्या जून्या टीकेचा संदर्भ देत तारीख जाहीर केली

देशातील जवळपास सर्वच लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपाने सातत्याने राम मंदीर उभारणीचा मुद्दा निर्माण करत लढविल्या. त्यानंतर मधल्या काळात कधी राम मंदीर उभारणीचा मुद्दा मागे ठेवला. मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मस्जिद प्रकरणी अंतिम निकाल दिल्यानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर टीका करण्यास …

Read More »

काँग्रेसच्या पहिल्याच सुकाणू समितीत मल्लिकार्जून खर्गेंनी मांडली भविष्यकालीन योजना

सोनिया गांधी जी आणि काँग्रेस सुकाणू समितीचे सर्व सन्मानित सहकारी…सुकाणु समितीच्या पहिल्या बैठकीत मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो.. अध्यक्षपदासाठी माझ्यावर विश्वास दाखवलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व सहकाऱ्यांचाही मी आभारी आहे. सोनियाजी गांधी यांनी कुशल नेतृत्व, अथक परिश्रम व काँग्रेस पायाभूत सिद्धांतावर मोठ्या आत्मविश्वासाने दोन दशके काँग्रेस पक्ष व देशाला मार्गदर्शन …

Read More »

राज ठाकरेंच्या निशाण्यावर राज्यपाल, राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे

भारत जोडो यात्रेच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा. सावरकर यांच्या माफीनाम्याचे पत्र जाहिर करत टीका केली. या टीकेवरून मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, राहुल गांधी यांनी स्वा.सावरकर यांच्यावर टीका केली. अरे तुझी लायकी तर आहे का? असा सवाल करत गुळगुळीत मेंदूचा राहुल गांधी असल्याची टीका केली. गोरेगांव …

Read More »

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व भारत जोडो यात्रा समन्वयक बाळासाहेब थोरात यांचे पत्र..

काँग्रेस खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यात अनेकांचे सहकार्य लाभले. ही ऐतिहासिक पदयात्रा यशस्वीपणे पार पडावी यासाठी महाराष्ट्रातील जनता, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांनी १४ दिवस उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राहुल गांधीबरोबर पायी चालत आपल्या समस्या, व्यथा, वेदना सांगितल्या व राहुल गांधी यांनीही त्या ऐकून घेतल्या. …

Read More »

महाराष्ट्रातील प्रचंड प्रतिसादानंतर भारत जोडो यात्रेचे मध्य प्रदेशात जल्लोषात स्वागत

भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राने खूप चांगले नियोजन आणि आयोजन केले त्यासाठी त्यांना A+ गुण दिले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने मोठा पाठिंबा दिला. १४ दिवसात महाराष्ट्राकडून खूप काही शिकायला मिळाले. महाराष्ट्रातून सर्व देशात संदेश गेला आहे. आता मध्य प्रदेशात ३७० किलोमीटरची पदयात्रा करून पुढचा प्रवास करत श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवणार, याला कोणीही रोखू …

Read More »

राहुल गांधी यांनी भावनिक होत दिला महाराष्ट्रातील जनतेला संदेश

कन्याकुमारीहून सुरु झालेली भारत जोडो यात्रा मागील १४ दिवसांपासून महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातून प्रवास करत मध्य प्रदेशच्या दिशेने पुढे गेली. मात्र या १४ दिवसात महाराष्ट्रात मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भावनिक होत महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. काय दिला संदेश महाराष्ट्रातील जनतेला वाचा त्यांच्याच शब्दात…. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा …

Read More »

लहान – थोरांच्या तोंडीही ” नफरत छोडो, भारत जोडो’!

“नफरत छोडो, भारत जोडो”चा नारा लहान-थोरांमध्ये आता चांगलाच लोकप्रिय झाला आहे. गावामध्ये दुतर्फा उभ्या असलेल्या गर्दीला भारत यात्री साद घालताच त्याचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यावरुन ही यात्रा घराघरात पोहचल्याचे दिसत होते. वडशिंगी (जिल्हा बुलढाणा) मध्येही हे चित्र पाहायला मिळाले. हजारो आदिवासी आपल्या मागण्या घेऊन यात्रेत पुढे चालत होते. नंदुरबार …

Read More »

भारत जोडो यात्रेत आदिवासी कष्टकरी महिलांचा सहभाग

आदिवासी हे देशाचे मालक आहेत पण त्यांचे मालकी हक्क मिळू नयेत ते आदिवासी नाही तर कायम जंगलातच रहावेत म्हणून त्यांना वनवासी संबोधून त्यांची खरी ओळख पुसण्याचे काम भाजपा करत आहे. आदिवासी हे काँग्रेससाठी आदिवासी आहेत आणि आदिवासीच राहतील. जल जंगल जमीन चा अधिकार तर तुम्हाला मिळालाच पाहिजे पण त्याबरोबर शिक्षण …

Read More »

राहुल गांधींची टीका, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर…

भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकरी चारीबाजूंनी नाडवला जात आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व शेतीला उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे मोदी सरकारने आणले होते. या जुलमी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांनी आवाज बुलंद करत दिल्लीला घेराव घालून ऐतिहासिक आंदोलन केले. मोदी सरकारला अखेर शेतकऱ्यांच्या आवाजासमोर झुकावे लागले व तीन काळे कायदे …

Read More »