Breaking News

Tag Archives: obc reservation

फडणवीसांचे आव्हान, देता येत नाही म्हणून सांगा ४ महिन्यात ओबीसींना आरक्षण ओबीसी आरक्षण पूर्ववत होईस्तोवर स्वस्थ बसणार नाही

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमधील ओबीसी नेत्यांकडून परस्परविरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसींना आरक्षण देता येत नाही असे सांगा चार महिन्यात आरक्षण मिळवून देतो अन्यथा पदावर राहणार नाही असे आव्हान महाविकास आघाडी सरकारला आज दिले. मुंबई येथे …

Read More »

मोदी सरकारने डाटा न दिल्याने ओबीसींवर ही वेळ ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी भाजपचे राज्य सरकार असतानाच केंद्राने त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली. पाच वर्ष हातात असताना ओबीसींचे प्रश्न का सोडवले नाही असा सवाल करतानाच भाजपला खरी काळजी असेल तर त्यांनी केंद्राकडून इंपेरिकल डाटा घ्यावा. जनतेला सुद्धा माहित आहे, कोणी कोणाच्या घरी जाऊन आता डाटा गोळा करू शकत नाही. डाटा ताबडतोब …

Read More »

ओबीसी आरक्षण फडणवीसांनी वाचविले तर आघाडीने घालविले राज्य सरकार विरोधात २६ ला राज्यव्यापी आंदोलन - पंकजा मुंडे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी नाकर्त्या राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले असते, तर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमाविण्याची वेळच आली नसती. फडणवीस सरकारने तातडीने हालचाली केल्यामुळेच त्यावेळी हे आरक्षण वाचले. मात्र त्या नंतर आघाडी सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही वेळेत पूर्ण केली नाही. आघाडी सरकारमधील मंत्री आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ …

Read More »

अधिवेशनासह या प्रश्नी भाजपाचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला अध्यक्षांची निवडणूक टाळून संवैधानिक व्यवस्था कोलमडली, राष्ट्रपतींना अहवाल पाठवा

मुंबई: प्रतिनिधी राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना केवळ दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी निर्देश देऊन सुद्धा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली जात नाही. त्यामुळे राज्यातील संवैधानिक व्यवस्था कोलमडली असल्याचा अहवाल राष्ट्रपतींना पाठविण्यात यावा, ओबीसी आरक्षण पूर्ववत होईस्तोवर स्थानिक …

Read More »

उद्घाटनाला, बारमध्ये गर्दी चालते मग अधिवेशनावेळीच कोरोना कसा आठवतो? तिघांच्या भानगडीत जनतेला खड्ड्यात का टाकता? : देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, विविध समाजबांधव यांचे अनेक प्रश्न आज ऐरणीवर असताना, मराठा तसेच ओबीसी आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी होत असताना केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. तीन पक्षांच्या भानगडीत जनतेला खड्ड्यात का टाकता? तीन पक्षांच्या राजकारणासाठी जनतेचा आणि लोकशाहीचा बळी देणे, हे अतिशय दुर्दैवी …

Read More »

ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपाचा २६ जूनला राज्यात चक्काजाम प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली आणि ओबीसी …

Read More »

अजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: प्रतिनिधी कोरोना काळात जनतेचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी सरकारच्या सर्व लोकांनी लक्ष घातले. सरकारने केलेल्या आवाहनाला जनतेनेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरकारने कोरोना रुग्णांच्या आकडेवारीबाबत कुठेही लपवाछपवी केली नाही. लोकांना लस कशी मिळेल आणि विशेष म्हणजे दोन डोस कसे देता येईल हा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. परंतु कोट्यवधी लोकसंख्येचा विचार करता …

Read More »

पंतप्रधान-मुख्यमंत्री भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘केंद्राला भेटून फायदाच नाही’ महाराष्ट्राच्या हाती असलेल्या विषयांपेक्षा केंद्राकडे असलेल्या विषयांवर पाठपुरावा करणे केव्हाही चांगले!

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत महाराष्ट्राला मिळत असतेच. परंतु केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या विषयांवर पाठपुरावा केला तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रापुरता आहे. देशातील अन्य राज्यात ते आरक्षण सुरक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे मागासवर्ग आयोग गठीत करून पुढील कारवाई …

Read More »

कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करून पुढे जाऊ मात्र आरक्षणप्रश्नी भाजपा दुतोंडी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी कुठल्या पध्दतीने ओबीसी आरक्षण देता येईल याबाबतीत कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करून ज्या काही प्रक्रिया करणे गरजेच्या आहेत त्या पूर्ण करुन पुढे जाऊ. मात्र आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपाकडून नेहमीच दुतोंडी भूमिका घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. दरम्यान या राज्यात मंडल आयोगाच्या शिफारशी …

Read More »

आदेशनुसार माहिती सादर न केल्यानेच ओबीसींचे आरक्षण गेले! अजूनही वेळ गेली नाही, तातडीने पाऊले उचला : देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात यापुढे होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी एकही जागा राखीव असणार नाही. महाविकास आघाडी सरकारने आतातरी लक्ष घालून पुढच्या उपाययोजना तातडीने हाती घेतल्या पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »