Breaking News

Tag Archives: maharashtra-karnataka border issue

नाना पटोलेंचा आरोप, सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे षडयंत्र ईडीचे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दळभद्री सरकार

सीमाभागात कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे पण आमचा संयम सुटला तर कर्नाटक व केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत सीमावाद उकरून …

Read More »

भाजपाचा इशारा संजय राऊत, चिथावणी देणे बंद करा, अन्यथा संयम सुटेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

. संजय राऊत यांनी तुरुंगात शिकलेली षंढ, नामर्द अशी भाषा वापरून चिथावणी देणे आणि आव्हान देणे बंद केले पाहिजे, अन्यथा संयम सुटेल आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल, असा खणखणीत इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

काँग्रेस नेते थोरात यांचा सवाल, हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे? सीमा भागातील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी

सीमा भागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रातील ट्रक, बस व वाहनांची तोडफोड केली जात आहे. महाराष्ट्र कर्नाटकची अशा प्रकारची दंडेली सहन करणार नाही. सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चिंता व्यक्त करुन मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले पण मुख्यमंत्री मात्र गप्पच …

Read More »

धारावीचे टेंडर विशिष्ट व्यक्तीला मिळाल्याने सीमावाद घडवून आणला का? शरद पवारांची भूमिका स्पष्ट अदानीला पुर्नविकासाचे टेंडरवरून साधला भाजपावर निशाणा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर अनेक दिवस चर्चेत नसलेला सीमावादाचा भाजपाच्या कर्नाटकातील मुद्दा अचानक पुढे आणला जात आहे. त्यातच या सीमावादाचा धारावी पुनर्विकास प्रकल्पाशी संबंध जोडला जात आहे. एका विशिष्ट व्यक्तीला हे टेंडर मिळावं आणि त्याला विरोध होऊ नये म्हणून हा वाद पुढे आणला …

Read More »

सीमावादावर भाजपा म्हणते, सत्तेत असताना शांत बसणा-यांना कंठ कसा फुटला? सीमाप्रश्नावरून भाजपाचा ठाकरेंना सवाल

जनादेश खुंटीवर टांगून बळकावलेली सत्ता गेल्यामुळे नैराश्य आलेल्या महाविकास आघाडीला विरोधकाची भूमिकाही जमत नसून त्यातून आलेल्या नैराश्यातून १७ डिसेंबरचा मोर्चा घोषित करण्यात आला अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री …

Read More »

न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगत महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ …

Read More »

बेळगावात मराठी भाषिकांसाठी मार खाणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना सीमावासियांचा विसर ठाकरे सरकार असताना अनेक योजना मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात सीमावासियांकडे पाठ

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात त्यावेळचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावित मविआ सरकारला उलथवून टाकले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी विधानसभेत बहुमत सिध्द करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जून्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, …

Read More »

सीमाभागात मराठी भाषकांवरील हल्याप्रकरणी भाजपा गप्प का ? महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दीपक दळवींवरील हल्ल्याचा निषेध: नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम बेळगावमध्ये महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दीपक दळवी यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. सीमा भागात मराठी बांधवांची गळचेपी केली जात असताना कर्नाटकातील भाजपाचे सरकार बघ्याची भूमिका घेत असून मराठी भाषकांवरील हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याने निषेध करण्याचे सौजन्यही दाखवले …

Read More »

स्वतंत्र भारतातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या लढ्याला महाविकास आघाडीकडून सोबतीचे आश्वासन महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांचे सीमाभागातल्या बांधवाना पत्र

मुंबई : प्रतिनिधी  भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेल्याने १ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी सीमाभागातल्या जनतेसाठी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व  छगन भुजबळ …

Read More »