Breaking News

Tag Archives: break the chain

१२ वीची परिक्षा रद्द तर राज्यात पाच टप्प्यात पूर्णत: अनलॉक निर्बंध मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी १० वी पाठोपाठ १२ वीची परिक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध पाच टप्प्यात उठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली …

Read More »

BreakTheChain च्या निर्बंध आणि शिथिलतेबाबत मनात गोंधळ आहे? मग वाचा हे ३० मे २०२१ रोजी जाहीर ब्रेक दि चेन आदेशासंबंधी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे

प्रश्न १: कोविड निर्बंधांसाठी प्रशासकीय घटक (महानगरपालिका किंवा जिल्ह्याचा इतर भाग) क, ड किंवा ई यापैकी कोणत्या श्रेणीत असावे हे कोण ठरवते? उत्तर:- हे निर्णय जिल्हा व्यवस्थापन प्रशासन (डी एम ए) घेते आणि तात्काळ त्याची घोषणा करते. यानंतर वेगवेगळ्या प्रशासकीय घटकांसाठी तिथल्या आवश्यकतेनुसार सदर मापदंड ठरवले जातील. प्रश्न २- जर …

Read More »

BreakTheChain नुसार असे राहणार जिल्हानिहाय लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार

मुंबई : प्रतिनिधी ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी …

Read More »

#BreakTheChain आनंदाची बातमी: टप्प्याटप्प्याने निर्बंध उठविणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आणि बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी राज्यात १४ एप्रिल २०२१ रोजीच्या रात्री ८ वाजल्यापासून राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. येत्या १ जून २०२१ रोजी त्यास दिड महिने पूर्ण होत असून १ जूनपासून राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्या टप्प्याने उठविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

#BreakTheChain अंतर्गत आता ही दुकानेही उघडी राहणार अत्यावश्यक प्रवर्गात समावेशाचे राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी १५ मे  ते २० मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर आलेल्या पावसाळ्यात प्रभावित होण्याची शक्यता असणाऱ्या बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याशी संबंधित दुकाने / व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक प्रवर्गात करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या प्रसाराची शृंखला तोडण्यासाठी राज्य शासनाने १३ एप्रिल …

Read More »

राज्यात पुन्हा BreakTheChain अंतर्गत १५ दिवसांसाठी कडक निर्बंध १ मे रोजीपासून सकाळी ७ ते १५ मे रोजी सकाळी ७ पर्यत निर्बंध

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल २०२१ रोजीपासून ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले. तरीही राज्यातील कोरोनाच्या संख्येत सातत्याने वाढच होत असल्याचे दिसत असल्याने पुन्हा एकदा १५ दिवसांसाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार १ मे पासून १५ मे …

Read More »

ब्रेक दि चेन निर्बंधातंर्गत नवे नियम लागू झाले पण प्रवास, रेल्वेने जायचाय: तर हे वाचा राज्य सरकारने केले लोकांच्या शंकाचे निरसन

प्रश्न १ – डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये कोणत्याही निर्बंधांचे शिवाय प्रवास करू शकतात का? उत्तर – होय. डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये व्यक्तिगत/ खाजगी किंवा सार्वजनिक वाहनाचा वापर करून त्यांना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या ओळख पत्राच्या आधारे प्रवास करू शकतात. त्यांच्या प्रवाशाचे निमित्त वैद्यकीय आणि आरोग्यशी संबंधित असणे अपेक्षित …

Read More »

१३ विद्यापीठांच्या परिक्षा ऑनलाईन होणार आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून दिवसेंदिवस कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याने अकृषिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परिक्षा घेणे अशक्य झाले. त्यामुळे या सर्व परिक्षा आता ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्य सरकारने आज आणखी कडक निर्बंध …

Read More »

‘BreakTheChain‘ नव्या नियमावलीनुसार याच गोष्टींना फक्त परवानगी, वाचा रात्री ८ वाजल्यापासून अंमलबजावणीला सुरुवात

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारला खात्री पटली आहे की महाराष्ट्र राज्यामधे कोविड-१९च्या संसर्ग फैलावापासून धोका आहे आणि त्यामुळे हा विषाणू फैलाव रोखण्यासाठी आणि संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी काही आपत्कालीन पावले उचलणे अपरिहार्य झाले आहे. साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील कलम २ आणि आनुषंगिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदी यातून प्राप्त झालेल्या …

Read More »

७ लाख १५ हजार रिक्षा परवाना धारकांनो नावे नोंदवा आणि सानुग्रह अनुदान घ्या नाव नोंदविण्याचे परिवहन मंत्री, ॲड. अनिल परब यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्यानुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे सोबत मंत्रालयात  बैठक संपन्न झाली. राज्यात सात लाख …

Read More »