Breaking News

Tag Archives: लोकसभा निवडणूक २०२४

पाचव्या टप्प्यात मुंबईतील ७४ लाख ४८ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवार २० मे २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे. या मतदानाची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात ७४ लाख ४८ हजार ३८३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली आहे. …

Read More »

नरेंद्र मोदी यांचे भाकित, नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये…

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव होणार असून मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचे स्थान देखील त्यांना मिळणार नाही. कदाचित त्याची जाणीव झाल्यामुळेच आता महाराष्ट्रातील एका नेत्याने आपली दुकाने बंद करून काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला विरोधी पक्षांना दिला असून महाराष्ट्रातील नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार असून तसा निश्चय …

Read More »

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले नाते घट्ट आहे व मतांसाठी आपण काम करत नाही असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा जाहीर सभेत राम मंदिर व मुस्लीम द्वेषावर भर देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, आता देशातील जनता …

Read More »

लोकसभेच्या चवथ्या टप्प्यात अजेंडा रहीत निवडणूक

लोकसभा निवडणूकीच्या २०२४ च्या चौथ्या टप्प्यात सोमवारी ९६ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यासह २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आतापर्यंत, ३७९ मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे, ज्यात सोमवारी आंध्र प्रदेशातील सर्व २५ आणि तेलंगणातील सर्व १७ जागांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात एकाच वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व १७५ …

Read More »

शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढे ढकलली

शिक्षक आमदारकीची निवडणूक १० जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. अखेर आनंदाची बातमी आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतला आहे. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्या सोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली …

Read More »

अमित शाह यांचे आवाहन, … राहुल गांधी यांना सत्तेपासून दूर ठेवा

गेल्या दहा वर्षांची यशस्वी कारकीर्द आणि पुढील पंचवीस वर्षांच्या देशाच्या प्रगतीचा स्पष्ट आलेख असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवून देशाची जनता देशाच्या समृद्धीची, विकासाची वाटचाल सुरू ठेवणार आहे, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शाह यांनी सोमवारी धुळे येथे व्यक्त …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. याच प्रज्वल रेवन्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागितली आहेत. रेवन्नाचा भांडाफोड होताच त्याला भारतातून परदेशी पळून जाऊ दिले. महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलले नाहीत. या …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५२ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीच्या आज चवथ्या टप्प्यात जवळपास ९३ मतदारसंघात मतदान पार पडले. या निवडणूकीत महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातही मतदान पार पडले. दरम्यान, पुणे, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान आणि मतदारांना मतदाना आकर्षित करण्यासाठी रोख रकमेचे वाटप करण्यात आल्याची घटना काही मतदारांनी तर काही राजकिय कार्यकर्त्यांनी केली. महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगांव, रावेर, जालना, औरंगाबाद, …

Read More »

मुंबईतील दोन उमेदवारांवर खर्च नोंदवही सादर न केल्यामुळे गुन्हे दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुनील यादव (आयआरएस) हे तीन वेळेस 28 – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदींची तपासणी करणार आहेत. मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची प्रथम तपासणी ९ मे २०२४ रोजी करण्यात आली. या तपासणीत नॅशनल पीपल्स …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान, या पाच प्रश्नांची उत्तरं द्यावीत

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमान पत्राचे संपादक संजय राऊत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. या मुलाखतीतवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करत पाच प्रश्न उद्धव ठाकरे यांना देत याची उत्तरे देण्याचे …

Read More »