Breaking News

Tag Archives: मुंबई विद्यापीठ

देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या विद्यापीठाची डॉक्टरेट मुंबई विद्यापीठात देणार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या, मंगळवार, २६ डिसेंबर २०२३ रोजी जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौर्‍यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती. कोयासन …

Read More »

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास सरकारची मान्यता

मुंबई विद्यापीठात रिक्त पदांवर मनुष्यबळ भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रा. वर्षा …

Read More »

४५ % कमी गुणांचे प्रकरणः मुंबई विद्यापीठाने मागविली माहिती

मुंबई विद्यापीठाने ४५ % कमी गुणांच्या प्रकरणाची दखल घेत F.Y.B.Sc. (I.T.) या अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती मागविली आहे. महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी अंधेरी पूर्व येथील श्री राजस्थानी सेवा संघातर्फे संचालित महाविद्यालयातील ३३ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास परवानगी न दिल्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, …

Read More »

अमित शाह म्हणाले, सहकार चळवळीने स्वतःला बदलणे आवश्यक देशातील तीन लाख विकास सेवा संस्थांचे बळकटीकरण करणार

सहकार चळवळीने कालानुरुप स्वत:ला बदलणे आवश्यक आहे. देशात रोजगारनिर्मिती सोबतच आर्थिक विकास वाढविण्याची ताकद सहकार क्षेत्रात आहे. केंद्र सरकारही सहकार विद्यापीठाची स्थापना करुन त्या माध्यमातून बॅंक, दुग्धव्यवसाय, कृषी, विपणन क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार आहे. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे …

Read More »

भारत-युके उच्च शिक्षणाच्या संधीचे नवे दालन शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमात युके- भारत भागीदारीचे होणार सक्षमीकरण

शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमात भारत-युके भागीदारीचे सक्षमीकरणाच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ब्रिटीश कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार २१ सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील फिरोजशाह मेहता सभागृहात महाराष्ट्र- युनायटेड किंगडम उच्च शिक्षण परिषद पार पडली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, भारत-युके रोडमॅप २०३० आणि जी-२० नुसार उच्च …

Read More »

मुंबई विद्यापीठात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ ज्युरिस्ट’ कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली प्रारंभाचा शताब्दी सोहळा

मुंबई विद्यापीठाचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील ‘ग्रेज इन’ या संस्थेतून प्राप्त केलेल्या बॅरिस्टर या सर्वोच्च पदवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाची वकिलीची सनद प्राप्त करून ५ जुलै १९२३ रोजी वकिलीस प्रारंभ केला. या ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर ई-समर्थ प्रणालीच्या माध्यमातून पहिल्यांदाच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश

मुंबई विद्यापीठातील शैक्षणिक विभाग, मान्यताप्राप्त संस्था आणि संलग्नित महाविद्यालयातील ( स्वायत्त महाविद्यालये वगळून) पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच ई-समर्थ प्रणालीच्या माध्यमातून ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाने प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषांने एकेडॅमिक बँक ऑफ …

Read More »

आयडॉलच्या एमएमएस व एमसीए प्रवेश परीक्षांचे अर्ज १२ जुलै २०२३ पासून ऑनलाईन सुरु दूरस्थ पध्दतीने घेता येणार शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन अर्थात आयडॉल संस्थेला २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांसाठी एआयसीटीई व यूजीसीने एमएमएस व एमसीए हे दोन अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु करण्यास परवानगी दिली असून या अभ्यासक्रमाचे प्रवेश परीक्षांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून आजपासून ( बुधवार, दिनांक १२ जुलै २०२३ ) सुरु होत असून शेवटची तारीख …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या या १२ महाविद्यालयांना स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करण्याचा दर्जा मिळणार

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा (Empowered Autonomous College) दर्जा देण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या शिफारशीवरून व्यवस्थापन परिषदेने १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे. यानुसार आता या अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित/सह (Joint Degree) पदवी प्रदान करता …

Read More »