मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या लोकसभेतील विजयाला शिवसेना (उबाठा) नेते राजन विचारे यांनी निवडणूक याचिकेतून आव्हान दिले. या निवडणूक याचिकेच्या निमित्ताने जप्त केलेली मतदान यंत्र ( (ईव्हीएम मशीन) ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्याचे आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने दिले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर …
Read More »नारायण राणे यांचा निवडणूकीतील विजय भ्रष्ट मार्गाने, निवडणूक आयोगाला नोटीस लोकसभा निवडणूकीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याची तक्रार
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात घालण्यात यावी यासाठी कायदेशीर नोटिस ठाकरे सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणुक आयोगाला अॅड. असीम …
Read More »वंचित बहुजन आघाडीची कबुली, भाजपा विरोधक म्हणून सांगण्यात कमी पडलो विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक लोणावळा येथे पार पडली. महाविकास आघाडीसोबत युती न झाल्याने १८ व्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या विरोधात लढण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय यावर …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उबाठा पेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
१९ जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले …
Read More »छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, …महायुतीला ठेच लागली फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेतील सर्व घटकांना आगामी निवडणुकीत संधी द्यावी
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागली आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. यापुढील काळात आपल्या रस्त्यातील दगड धोंडे बाजूला सारून पुन्हा ठेच लागणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत जो समाज आपल्यापासून दुरावला गेला आहे त्याच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी फुले, शाहू आंबेडकरांचे विचार आपल्याला कृतीतून दाखवावे …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, मी पळणार नाही तर लढणारा विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकेपर्यंत थांबणार नाही
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेला खोटा प्रचार फार दिवस टिकणारा नाही. विरोधकांच्या अपप्रचाराला योग्य उत्तर देऊन विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकविल्याखेरीज मी थांबणार नाही, आणि तुम्हीही थांबू नका असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत हा देवेंद्र फडणवीस पळणारा नाहीतर लढणारा असल्याची स्पष्टोक्ती भाजपा आमदारांच्या बैठकीत बोलताना दिली. भाजपा आमदारांच्या …
Read More »संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही
आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांना उमेदवारी देणार होता. तशी मागणीही नसीम खान यांनी केली होती. परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांनी मुस्लिम उमेदवार देण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे आम्ही वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याचे …
Read More »मतदार म्हणून नाव नोंदवलं नाही, पण मतदान करण्याची इच्छा आहेः बातमी वाचाच
निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी व हरकती मागवण्यासाठी हा साधारण १० दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे. राज्यात पाचव्या टप्प्यात २० …
Read More »नरेंद्र मोदी यांचा आरोप, साहेबजादे हारतील… परदेशातील शक्तींशी हात मिळवणी
२० एप्रिल रोजी राजकीय पक्षांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुस-या टप्प्यासाठी त्यांच्याच पक्षाला मतदारांनी मतदान करावे यासाठी प्रचाराची जोरात सुरुवात केली. कर्नाटकातील चिक्कबल्लारपुरा येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकेची झोड उठवित म्हणाले की, भारतातील आणि परदेशातील मोठ्या आणि शक्तिशाली लोकांनी त्यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी …
Read More »गडचिरोलीत १११ वर्षाच्या फुलमती यांचे मतदान
१२-गडचिरोली-चिमूर मतदारसंघात १११ वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार या वृद्ध महिलेने गृह मतदानाची सुविधा नाकारत प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान नोंदविले. फुलमती बिनोद सरकार या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजीचा आहे. नातवाच्या दुचाकीवर बसून त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन स्वतः मतदान करत मतदारांमध्ये उत्साह …
Read More »