Breaking News

Tag Archives: भाजपा

मुंबई उपनगरात झोपड्पट्टीवासीयांसाठी बांधणार ४० हजार शौचालये पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याद्वारे वांद्रे (प.) नित्यानंद नगर येथील लॉट १२ अंतर्गत दुरुस्त केलेल्या सार्वजनिक शौचालयांचे आज पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लोकार्पण केले. यावेळी आमदार आशिष शेलार व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची स्वच्छतागृहाची …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, भाजपा सत्तेत असतानाच ‘गोडसेच्या औलादी’ का फोफावतात ? अतिरेकी नथुराम गोडसेचे उदात्तिकरण करणाऱ्या सदावर्तेला बेड्या ठोका

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी अतिरेकी नथुराम गोडसेचा उदो उदो करण्याची प्रवृत्ती देशात बळावत चालली आहे. नथुराम गोडसे हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी आहे हे जगजाहीर असताना त्याचे गुणगान गाण्याची हिम्मत फक्त भारतीय जनता पक्षाचे सरकार असतानाच होते. सदावर्ते नावाच्या एका विकृत इसमाने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालावर …

Read More »

आदित्य ठाकरे यांची टीका, न्यायाला उशीर करणं फक्त आमच्यावर नाही तर… ट्विट करत केला राहुल नार्वेकर यांच्यावर वार

लोकसभा निवडणूका जवळजवळ येत आहेत. तसे राज्यातील अपात्र आमदारांबाबतचा निकाल लांबविण्याचे काम सुरु असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात येत आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत आहेत असा ठपकाही ठेवण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ट्विटकरून निशाणा साधला. यावेळी …

Read More »

अशोक चव्हाण टीका करताना सनी देओल स्टाईल म्हणाले, फक्त “तारीख पे तारीख” शिदें-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र

राज्यातील गंभीर प्रश्नांवर आरक्षणावर फक्त “तारीख पे तारीख” मिळत असल्याची उपरोधिक फिल्मी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदार अपात्रतेप्रकरणी सातत्याने तारीख पे ताऱीख दिली जात आहे. तसेच मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकिय आरक्षण, धनगर आरक्षण प्रश्नी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, शासन जनतेच्या दारी तर मग जनता शासनाच्या दारी का ? मंत्रालयात येण्यापासून सर्वसामान्यांना रोखणे ही हुकुमशाही

राज्यातील शिंदे सरकारला केंद्रातील भाजपा सरकारच्या हुकूमशाही कारभाराची लागण झालेली आहे. केंद्र सरकार मुठभर लोकांसाठी काम करते तसेच राज्य सरकारही काम करत आहे. सरकार सामान्य जनतेची कामे करण्यासाठी आहे, मुठभर लोकांसाठी नाही. आपले काम स्थानिक पातळीवर होत नाही म्हणूनच लोक मंत्रालयात येत असतात. मंत्रालयात दलालांना मुक्त वावर आहे आणि सुरक्षेचे …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल,… पंतप्रधान मोदी नक्षलवाद्यांचे पंतप्रधान आहेत का? मोदी सरकारची धोरणे, योजना ह्या मित्रों व अदानीच ठरवतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना सर्व पातळी सोडली आहे.काँग्रेस पक्ष नक्षलवादी चालवतात हा मोदींचा आरोप बालिश आणि अत्यंत हास्यास्पद आहे. तसेच पंतप्रधानपदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. मोदींनी याआधी दलितांना नक्षलवादी म्हटले, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या देशातील शेतकऱ्यांनाही आतंकवादी, खलिस्तानी, नक्षलवादी म्हणून अपमानित केले होते. ८० कोटी अन्नदात्यांनी …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचं सोंग राजकिय नेतृत्वामुळे नागपूरकरांना पूरपरिस्थितीला सामोरे जावं लागलं

आपल्या मर्जीतील गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचा सोंग घेऊन नागपूरच सिमेंटीकीकरण व पर्यावरणाचा ऱ्हास करून नागपूरकरांना पूर परिस्थितीत ढकलून देण्याच पाप हे स्थानिक राजकीय नेतृत्वाने केलं, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला. अंबादास दानवे यांनी आज नागपूर येथे आलेल्या पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा …

Read More »

नाना पटोले यांची टीका, संविधान आणि लोकशाहीला धाब्यावर बसवून… पत्रकारांचा अवमान करणा-या चंद्रशेखर बावनखुळे आणि भाजपने माफी मागावी

२०१४ सालापासून देशात लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने व हुकुमशाही वृत्तीने भाजपचे सरकार काम करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अनैतिक व असंविधानिक मार्गाने राज्याची सत्ता मिळवण्याचे पाप भाजपाने केले आहे. पत्रकारांना ढाब्यावर चहापाणी देऊन भाजपला अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे व चालवण्याचे पाप झाकता येणार नाही, …

Read More »

चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून समाजातील तरूणांना पुढे नेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सर्वतोपरी मदत व प्रशिक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजमेळाव्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट, अनियंत्रित कारभाराचे पाप नागपुरातील पूर नैसर्गिक आपत्ती नाही तर सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट, अनियंत्रीत आणि गलथान कारभाराचे पाप

नागपूर शहरात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साठले व पूर परिस्थिती निर्माण झाली. नागपूरातील ही भयावह स्थिती सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट, गलथान आणि अनियंत्रित कारभाराचे पाप आहे. पुरामुळे शहरातील सुमारे दहा हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवन उपयोगी साहित्य पुरात भिजले आहे. त्यामुळे या नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासोबतच …

Read More »