Breaking News

Tag Archives: भाजपा

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व केवळ राजकीय द्वेषातून केलेला आहे. मोदी सातत्याने सनातन धर्म, अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेस व विरोधी पक्षांना हिंदू विरोधी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात. नरेंद्र मोदी जातीच्या व धर्माच्या नावाने समाजात द्वेषाचे विष पसरवण्याचे पाप …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा आरोप, ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कट

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले आणि ओबीसी समाजाचे संपूर्ण आरक्षण काढून घेऊन रातोरात मुस्लिमांना वाटून टाकले, आता हाच फॉर्म्युला देशभर राबविण्याचा काँग्रेसचा कट आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोल्हापूर येथे जाहीर सभेत बोलताना केला. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत …

Read More »

शरद पवार यांचा हल्लाबोल, एखाद्या हुकूमशहासारखं मोदींचा राज्यकारभार

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह आज जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला,… भाजपाची अवस्था विचित्र झालीय

लहान असताना राम राम म्हणटलं की भूत पळू जायची असे मी ऐकत होतो. पण ते खरं की खोटं मला माहित नाही. परंतु आता १० वर्षे देशाची सत्ता एकहाती राहिली. मात्र आता भाजपाची अवस्था विचित्र झाली आहे. आता त्यांना समोर पराभव दिसत असल्याने सारखं राम राम म्हणत आहेत, तशी अवस्था भाजपाची …

Read More »

प्रविण दरेकर यांची टीका, टोमणे मारणे हा उद्धव ठाकरेंचा स्थायीभाव

उद्धव ठाकरेंना केवळ बडबड करण्यापेक्षा दुसरे काहीच येत नाही. त्यांना ना महाराष्ट्राचे प्रश्न माहित, ना त्यांनी कधी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. फक्त उचलली जीभ लावली टाळ्याला एवढंच बडबड करण्याचे आणि मत्सराने, द्वेषाने टोमणे मारणे हा उद्धव ठाकरेंचा स्थायीभाव झाला असल्याची टीका भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी केली. तसेच …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची टीका, उबाठा रंग बदलणारा सरडा

युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात होते. आता मोदी यांच्या नावाने खडे फोडत असून इतक्या झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींच्या विरोधातील तक्रारीबद्दल नड्डा यांना नोटीस

केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांना नोटीस बजावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींवर पक्षाचे उत्तर मागितले आहे. ईसीआयने भाजपला २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. अशीच नोटीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भाजपाने राहुल गांधींविरोधात केलेल्या तक्रारींवरून बजावली होती. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाध्यक्षांना …

Read More »

अमित शाह यांचे शरद पवार यांना आव्हान

अमरावतीच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल अमरावतीकरांची माफी मागण्याऐवजी,केंद्रात कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांसाठी, विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी काहीच न केल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांची माफी मागून प्रायश्चित्त घ्या, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी अमरावती येथील जाहीर विजय संकल्प सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिले. अमरावती …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी काँग्रेस प्रणित युपीए सरकारने शिक्षण हक्क कायदा केला. भाजपाप्रणित शिंदे सरकारने मात्र या कायद्यात मनमानी व बेकायदेशीर बदल करून वंचित व दुर्बल घटकांतील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा आणली आहे. गोरगरीब, वंचित आणि बहुजन …

Read More »

शरद पवार यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींचे भाषण म्हणजे लबाडाघरचं आवताण…

सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही. १० वर्षांत स्वतः काही केले नाही, आणि हिशेब आम्हाला मागतात. मोदींनी गेल्या दहा वर्षात एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. लबाडाच्या घरचे अवताण जेवल्याशिवाय खरं नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. माढा लोकसभा मतदारसंघात …

Read More »