Breaking News

Tag Archives: भाजपा

संजय राऊत यांचा पलटवार, पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक पर्याय, तुमच्याकडे तर…

तुमच्याकडे गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधान पदासाठी एकच चेहरा आहे. पण आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. यामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कुणीही पंतप्रधान होऊ शकतं. देशात इंडिया आघाडीची सत्ता येईल तेव्हा या नेत्यांपैकी कोणीही पंतप्रधान होऊ शकतो असा दावा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी …

Read More »

रेल्वे मंत्रालयाचे मुंबई महाराष्ट्राबाबतचे ते पत्र दाखवित मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल… रेल्वे स्टेशन स्थानकातील मोदींच्या ३डी फोटो सेल्फी पॉंईटची माहिती RTI मधून उघड

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये पाच पैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या ताब्यातील तीन मोठी राज्ये भाजपाने हिसकावून घेतली. त्यानंतर भाजपाने सरकारी योजना आणि सरकारी मालमत्तांचा वापर नरेंद्र मोदी पर्यायाने भाजपाच्या प्रचारासाठी वापरण्याचे धोरण स्विकारल्याचे दिसून येत आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ५० रेल्वे स्थानकांवर जनतेच्या पैशातून नरेंद्र मोदी …

Read More »

वांद्र्यांत ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे उद्घाटन, ५१३ स्टॉलचा समावेश

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी. म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘महालक्ष्मी सरस’च्या माध्यमातून २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पादनांची विक्री होईल, असा विश्वास व्यक्त करीत ८ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू असलेल्या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राच्या घोषणा हवेतच विरल्या

गेल्या ४८ तासांत दुष्काळ, सततची नापिकी याने त्रस्त ६ शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करत आहेत. मात्र वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा या घोषणाच राहिल्या असून त्या हवेत विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. कोरोनाच्या नव्या …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल,… खरंच गुड गव्हर्नन्स तरी आहे का?

देशाचे माजी पंतप्रधान तथा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा आज जन्मदिवस. परंतु या दिवसाचे औचित्य साधत केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस हा गुड गव्हर्नन्स दिवस म्हणून जाहीर करण्यात आला. मात्र याच दिवसाचे औचित्य साधत शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या विद्यापीठाची डॉक्टरेट मुंबई विद्यापीठात देणार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या, मंगळवार, २६ डिसेंबर २०२३ रोजी जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौर्‍यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती. कोयासन …

Read More »

सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, २८ आमदारांचा नव्याने समावेश

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने विजय मिळवित सत्ता कायम राखली. त्यानंतर मागील ७ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराजसिंग चौहान यांच्याऐवजी राज्याची धुरा अर्थात मुख्यमंत्री पदी मोहन यादव यांची निवड केली. या साऱ्या घटनेला १२ दिवसही पूर्ण होत नाही तोच मध्य सरकारने आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत २८ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला. १२ …

Read More »

बंडाच्या आरोपावरून शरद पवार यांचा अजित पवार यांच्यावर पलटवार

मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी कळाजी घेतली. मात्र, हे खरं आहे की गेल्या १० ते १५ वर्ष मी बारामतीत लक्ष घातलं नाही. मी कधीच कुठला निर्णय घेतला नाही. निर्णय घेतल्यानंतर त्याची कुठलीच तक्रार नसायची. आमच्या काळात बंड नव्हत आम्ही बसून निर्णय घ्यायचो असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, नरेंद्र मोदी ईव्हिएम मशिन्सला विरोध करत…

काँग्रेस पक्षाचा स्थापन दिवस २८ डिसेंबर यावर्षी नागपूरच्या ऐतिहासिक भूमित महारॅलीने साजरा केला जात आहे. काँग्रेसचा १३८ वा वर्धापन दिन नागपूरमध्ये होत आहे ही नागपूर व महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. “है तैयार हम” महारॅलीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आनंद आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा गोप्यस्फोट, आरएसएसने सरदार पटेलांच्या त्या तीन अटी… संविधान निर्धार सभेतून वैदिक धर्मावर हल्ला !

एका बाजूला इथे वैदिक परंपरा आहे ती विषमतावादी आहे आणि दुसऱ्या बाजूला संतांची परंपरा आहे ती बंधू भावाची असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या संविधान निर्धार सभेत केले. यावेळी, डॉ. बाबा आढाव, आमदार शिरिष चौधरी, आमदार कपिल …

Read More »