Breaking News

Tag Archives: भाजपा

नाना पटोले यांचा आरोप, शेतकऱ्यांची लूट आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त… ईव्हीएमवर भाजपा उमेदवारांनाही विश्वास नाही पण भाजपा सरकार व निवडणूक आयोगाची अडेलतट्टूची भूमिका

केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने जनतेला वा-यावर सोडून सत्ताधारी मजा मारत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, महागाई, बेरोजगारीने लोकांना जगणे कठिण झाले आहे. सरकारने बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतक-यांची लूट सुरु आहे. NEET चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त करणा-या भ्रष्टाचारी महायुती सरकारविरोधात काँग्रेसने आज राज्यभरात …

Read More »

अनिल परब यांचा आरोप, मिंधे आणि भाजपाने १२ हजार मतदारांची नावे बाद केली पदवीधर मतदारसंघातील विरोधी उमेदवारांचा पराभव करण्यासाठी निवडणूक आयोगाची मदत

मुंबई, कोकणातील विधान परिषदेवर निवडूण जाणाऱ्या निवडणूकीत आता चांगलीच रंगत निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाने नोंदविलेली १२ हजार मते मिधे अर्थात शिंदे गटाने आणि भाजपाने बाद ठरविल्याचा खळबळजनक आरोप मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब यांनी आज शिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला. …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, पुछता है भारत म्हणणाऱ्यांना देश आता पुसून टाकतोय शिवसेनेला संपवायला निघालेल्यांसोबत आम्ही कधीही जाणार नाही

लोकसभा निवडणूकीनंतर शिवसेना उबाठा गटाने शिवसेना वर्धापन दिनानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित केला होता. यावेळी उद्धव ठाकरे हे आपल्या पुढील वाटचालीसंदर्भात काय बोलणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावरही जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे आपल्या अध्यक्षीय …

Read More »

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळ बीआयटी वसाहतीत प्रवेशद्वार उभारा मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांचीमहापालिका आयुक्तांकडे मागणी

परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळच्या बीआयटी वसाहतीपर्यंत पोहचताना अनुयायी तसेच देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांना मोठी अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर वास्तूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक स्वरुपात विकसित करुन दोन्ही बाजूस डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन आज मुंबई भाजपा …

Read More »

नारायण राणे यांचा निवडणूकीतील विजय भ्रष्ट मार्गाने, निवडणूक आयोगाला नोटीस लोकसभा निवडणूकीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याची तक्रार

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात घालण्यात यावी यासाठी कायदेशीर नोटिस ठाकरे सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणुक आयोगाला अ‍ॅड. असीम …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक वाहन भत्ताही देण्याचा समावेश करावा

दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना येवू न देता शिकविणे जिकिरीचे काम आहे. नवीन शैक्षणिक धोरणातही या बाबीचे महत्व अधोरेखित केले आहे. राज्यातील दृष्टीहीन व दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

भाजपा सरकारविरोधात २१ जून रोजी काँग्रेसचे ‘चिखल फेको’ आंदोलन महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी आंदोलन

राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष शुक्रवार २१ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी ११.०० वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध …

Read More »

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती, भाजपाला देवेंद्रजींचेच नेतृत्व मोदी सरकारच्या नवीन योजना मतदारांपर्यंत पोहचविणारच; जुलै महिन्यात भाजपाची धन्यवाद यात्रा

महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून तेच राज्याचे नेतृत्त्व करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली. बुधवारी सकाळी नागपूर विमानतळावर चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकारांशी बोलत होते. तसेच काल …

Read More »

वंचित बहुजन आघाडीची कबुली, भाजपा विरोधक म्हणून सांगण्यात कमी पडलो विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक लोणावळा येथे पार पडली. महाविकास आघाडीसोबत युती न झाल्याने १८ व्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या विरोधात लढण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय यावर …

Read More »

लोकसभेचे उपसभापती पद न दिल्यास इंडिया आघाडी निवडणूक लढविणार एनडीए सरकारवर दबाव आणण्यासाठी आघाडीची रणनीती

लोकसभा निवडणूकीत एनडीए आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले. त्यानंतर आता बहुमत सिध्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारकडून पावसाळी अधिवेशन बोलावले असून या पावसाळी अधिवेशनातच सभापती आणि लोकसभेच्या उपसभापती पदावरील निवड करण्यात येणार आहे. परंपरेने सभापती पदावर केंद्रातील सरकारकडे असते, तर उपसभापती विरोधी पक्षांना देण्यात येते. मात्र जर उपसभापती …

Read More »