Breaking News

पुरस्कार वापसीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचे पंतप्रधानांना पत्र, जाणून घ्या काय लिहिले

नुकतेच ऑलंम्पिक स्पर्धेत भारताला कुस्ती खेळात पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी भाजपा खाजदार बिृजभूषण सरन सिंग यांच्या विरोधात केंद्र सरकारने कोणतीही कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ कुस्ती खेळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ ज्या कुस्ती खेळामुळे महिलांना नवी ओळख दिली. त्याच महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार करूनही आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी शब्द देऊनही तो पाळला नसल्याच्या निषेधार्थ कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी आज आपला पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांच्या शासकिय निवासस्थानाच्या बाहेर आपला परत ठेवला.

बजरंग पुनिया पद्मश्री पुरस्कार परत केल्यानंतर या संदर्भात ट्विट करत एक पत्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले असून हीच प्रतिक्रिया असल्याचे सांगितले.

बजरंग पुनिया यांनी ट्विट केलेल्या पत्रात म्हटले आहे की, कुस्ती या खेळाच्या माध्यमातून आम्ही पुरुष आणि महिलांनी देशाचा सन्मान वाढविला. तसेच ऑलंम्पिकमध्ये विजयी पदक जिंकून आणले म्हणून देशाच्या मानात आणखी एक तुरा खोवला. पुरुषांच्या बरोबरीने महिला कुस्ती पटूंनी त्याच भरच घातली. असे असताना अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बिृजभूषण सरण सिंग यांच्याकडून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करण्यात येत असल्याचा १४ महिला कुस्ती पटूंनी केला. त्यावर केंद्र सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. तसेच दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलन सुरु असतानाही दिल्ली पोलिसांनी आमचे आंदोलन स्थळ उद्वस्त करत आम्हा महिला कुस्तीपटूंनासह दिल्लीच्या बाहेर हाकलून लावले.

बजरंग पुनिया पत्रात पुढे लिहितात, देशाला कुस्ती खेळाच्या माध्यमातून मान सन्मान मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी लैगिंक शोषणाच्या विरोधात आवाज उठवूनही कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांच्या विरोधात कोणताही गुन्हा नोंदविला नाही. त्यामुळे आम्हाला अखेर न्यायालयात धाव घ्यावी लागली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सरण सिंग यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरु झाली. परंतु सुरुवातीला १९ महिला कुस्तीपटूनी यासंदर्भात आरोप केले. मात्र न्यायालयाने आदेश देईपर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यावेळी ब्रिजभूषण सिंग यांच्या गुंडागर्दीने १९ पैकी १२ जणींना त्यांच्या न्याय हक्काच्या मागणीपासून लांब रहायला भाग पाडले. तसेच आणखी एका आंदोलनकर्त्या महिला कुस्ती पटूला या लढ्यातून बाहेर पडायला लावले.

अखेर केंद्र सरकारकडून कोणतीच हालचाल होत नाही पाहुन सर्व महिला कुस्ती पटूंनी सरकारकडून मिळालेले सर्व मानसन्मान आणि ऑलंपिक पदके गंगा नदीत वाहण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत बजरंग पुनिया लिहितात, ज्यावेळी आम्ही निर्णय घेतला सर्व पदक नदीत सोडून देण्याचा त्यावेळी आपल्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांचा फोन आला. तसेच आमच्या मार्गदर्शकांनी आणि त्या मंत्र्यांने न्याय देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गृहमंत्री यांनी भेटून महिला कुस्तीपटूंच्या मागण्यांच्या अनुषंगाने सरकारवर जी जबाबदारी आहे ती पार पाडली जाईल आणि जी न्यायालयीन लढाई आहे ती लढाई वेगळी लढली जाईल असे आश्वासन देत महिला कुस्ती पटूंच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही देत सर्व महिला कुस्तीपटूंना आश्वस्त केले. परंतु नुकत्याच झालेल्या कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा निकाल जाहिर होताच लैंगिक शोषण करणारे भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सरण सिंग यांनी दबदबा है दबदबा रहेगा असे विधान केले. यावरून त्यांची गुंडागर्दी अशीच सुरु राहणार असल्याचे दिसून येत आहे.

इतकं सार करूनही जर ऑलंम्पिक विजेत्या एखाद्या महिला कुस्तीपटूला कुस्ती खेळच सोडावासे वाटलं तर इतक देशाला मान सन्मान मिळून देण्याला आणि सरकारकडून पद्मश्री पदक स्विकारण्याला काय अर्थ राहिला असे बजरंग पुनिया यांनी आपल्या पत्रात नमूद करत ज्या महिलेला बेटी बचाओ बेटी बढाओ या सरकारी अभियानाची ब्रॅड अॅम्बेसिडर बनवायला पाहिजे होते त्याच महिला कुस्ती पटूंना अपमानित करत या परिस्थिती आणून सोडले. त्यामुळे महिला कुस्तीपटूंबरोबर ज्या पध्दतीने सरकार वागले, त्याच सरकारने सन्मानार्थ दिलेले सर्व पुरस्कार आपल्या निवासस्थानी परत करत असल्याचे सांगत पुरस्कार परत करत असल्याचा निर्णय कळविला.

बजरंग पुनिया यांनी पत्राच्या शेवटी असन्मानित पहेलवान असे लिहिले आहे.

Check Also

निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *