Breaking News

पार्टी सुरू असतानाच हमासचे सैनिक इस्त्रायलच्या भूमीवर, गोळाबारात अनेकजण जखमी तर इस्त्रायलने केला हमासच्या गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयावरील हल्ल्याचा व्हिडिओ

पॅलेस्टाईनच्या हमास या लष्कराने शनिवारी इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणावर रॉकेट हल्ले केले. त्या हल्ल्यात आज रविवारीही सातत्य ठेवले. विशेष म्हणजे यावेळी रॉकेट हल्ले करत हमासचे सैन्य पॅराशूटच्या माध्यमातून इस्त्रायली भूमीवर उतरून इस्त्रायली नागरिकांवर गोळीबार करत आहेत. तर अनेक तरूणींचे अपहरण करून त्यांची अर्धनग्न धिंड काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे काही व्हिडिओ आता बाहेर येत आहेत.

गाझा पट्टीपासून काहीसे जवळ असलेल्या एके समुद्र किनारी इस्त्रायली नागरिकांकडून एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनेक इस्त्रायली नागरिक त्यात सहभागी होऊन मजा लुटत असतानाच अवकाशातून हमासचे अनेक सैनिक पॅराग्लॉयडिंगच्या सहाय्याने इस्त्रायली भूमीवर उतरत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हमास सैनिक नेमके या पार्टीच्या परिसरात पॅराग्लॉयडिंगच्या माध्यमातून जमिनवर उतरल्यानंतर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेथे असलेल्या तरू-तरूणींनी मिळेल त्या दिशेने धाव घेण्यास सुरुवात केली. तर काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या सैनिकांनी पार्टी सुरु असलेल्या ठिकाणी मोठ्या त्यांच्यासोबत असलेल्या बंदुकीतून गोळीबार करण्यास सुरुवात केल्याने अनेकजण मोठ्या प्रमाणावर जखमी झाले. त्याचबरोबर रॉकेटमधून पार्टीवर हल्लाही सुरुच होता.

दरम्यान, न्यु यॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार हमासचे अनेक सैनिक हे पूर्णपणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असून त्यांच्याकडे पॅराग्लॉयडिंगने उतरत असताना वाहने, अनेकविध पध्दतीची हत्यारे आणि अनेक गोष्टीं सोबत ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते इस्त्रायलच्या भूमीवर पाय ठेवताच इस्त्रायली नागरिकांमध्ये लगेच भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत.

द टाईम्स ऑफ इस्त्रायलने एका नोया रेव्येने या २० वर्षीय तरूणीच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, हमासच्या सैनिकांचे एक रॉकेट तिच्या डोक्यावरून गेले तेव्हा तेथे पार्टीसाठी येणाऱ्यांनी एकच धावपळ सुरु केली. त्यावेळे रेव्येने ही एका वाहनात बसत होती. मोकळी जागा असल्याने तेथे अनेक वाहने पार्क केली होती. तसेच तेथे फायरिंगचे आवाज मोठ्या प्रमाणावर येत असल्याने तेथील लोकांमध्ये एकच घबराट झाली आणि ते वाहनांच्या दिशेने पळाल्याचे पाह्यल्याचेही सांगितले.

दरम्यान, इस्त्रायली एअर फोर्सने एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये हमासच्या गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयावर इस्त्रायली एअर फोर्सकडून बॉम्ब टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *