Breaking News

विशेष बातमी

उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळून १२ जणांचा मृत्यू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत जाहिर

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात शनिवारी २६ प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर खोल दरीत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १६ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हे वाहन रस्त्यावरून घसरले आणि बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील अलकनंदा नदीच्या काठावर सुमारे २५० मीटर घसरले. बचावकार्य सुरू करण्यात आले …

Read More »

NEET-UG निकालः अखेर ग्रेस मार्क रद्द, परिक्षा पुन्हा घ्या न्यायालयाचे आदेश ग्रेस मार्क दिलेल्यांचे मुळ मार्क ग्राह्य धरा

NEET-UG 2024 वादाच्या संदर्भात, केंद्राने गुरुवारी (१३ जून) सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली की १५६३ विद्यार्थ्यांना देण्यात आलेले ग्रेस गुण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या १५६३ उमेदवारांना त्यांच्या वास्तविक गुणांची माहिती दिली जाईल (ग्रेस गुणांशिवाय) आणि त्यांना पुन्हा चाचणीसाठी उपस्थित राहण्याचा पर्याय दिला जाईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या वकिलांनी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने २०२२ च्या NEET-PG च्या प्रश्नांसंदर्भातील याचिका फेटाळली याचिका प्रलंबित ठेवता येणार नाही

नुकताच NEET-UG परिक्षेचा निकाल जाहिर झाला. मात्र या परिक्षेच्या निकालात अनेक नियमबाह्य गोष्टी घडल्याचे उघडकीस आले. या विरोधात देशातील काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज सुनावणी झाली, त्यावेळी १७ मे रोजी, समान सवलती मागणाऱ्या दुसऱ्या याचिकेवर विचार करताना, सर्वोच्च न्यायालयाने NEET-UG परीक्षेच्या निकालाच्या घोषणेला स्थगिती देण्यास नकार …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे NEET परिक्षाप्रश्नी सवाल, एनटीएने उत्तरे द्यावे बोला किती वेळ हवाय तुम्ही केले म्हणून काही पवित्र होत नाही

नुकत्याच झालेल्या NEET परिक्षेत नियमबाह्य पध्दतीने ग्रेस मार्क देण्याचा आणि एकाच परिक्षा केंद्रावरील ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याची घटना उघडकीस आली. या परिक्षेची प्रश्नपत्रिकाही फुटली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी जवळपास १६ विद्यार्थ्यींनी सर्वोच्च न्यायालयात आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रारी दाखल केल्या. या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल …

Read More »

७ वा टप्पा, मोदींच्या अविभाजीत लक्षासाठी तयार केलेला टप्पा राओआ पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये वाढू शकते

७२ वर्षांतील सर्वात प्रदीर्घ निवडणूक अखेरीस सात राज्यांतील ५७ मतदारसंघांत आणि चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशातील मतदानाने संपली. तीन राज्यांमध्ये – उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये – सहा आठवडे आणि सात टप्प्यांपेक्षा जास्त काळ लोकसभा निवडणूका सुरु होत्या. प्रत्येक कृतीचे प्रतिध्वनी पुढच्या निवडणूकीच्या टप्प्यात उमटत आहेत. ओडिशा आणि झारखंडसाठी हा …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयः सरकारी कर्मचारी अधिकार म्हणून पदोन्नती… कलम १६ अंतर्गत प्रश्न निर्माण झाला तरच न्यायालयाचा हस्तक्षेप

राज्य सरकारी कर्मचारी असो किंवा, केंद्र सरकारचा कर्मचारी असो, तो कर्मचारी एकदा सरकारी सेवेत रूजू झाला की, त्याला त्या त्या सरकारच्या नियमावलीप्रमाणे पदोन्नतीतही आरक्षण अंतर्गत पदोन्नती मिळते. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात केशवानंद भारती विरूध्द भारत सरकार या खटल्यामध्ये दिसून आले. तर के नागेश्वरन विरूध्द भारत सरकार खटल्यामध्ये प्रमो आदी खटल्यांमध्ये पदोन्नतीत …

Read More »

उच्च न्यायालयाचा निर्णय; हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा यांच्यातील विवाह वैध नाही मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अलीकडेच एका आंतर-विवाह करणाऱ्या जोडप्याला पोलीस संरक्षण देण्यास नकार दिला, या जोडप्याने विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत त्यांचे विवाह नोंदणीकृत केले आणि मुस्लिम पर्सनल बोर्ड लॉ नुसार मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्री यांच्यातील विवाह अवैध असल्याचे निरीक्षण नोंदवले. जोडप्याने पोलिस संरक्षण मागणारी याचिचा मध्य प्रदेश उच्च …

Read More »

भारतीय लष्करी अधिकारी राधिका सेन युएनचा जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा पुरस्कार

भारतीय लष्करी अधिकारी मेजर राधिका सेन यांना ३० मे रोजी UN सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्याकडून UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी मेजर राधिका सेन यांचे “खरे नेते आणि आदर्श” म्हणून कौतुक केले आहे. मेजर सेन यांनी काँगोमधील यूएन मिशनमध्ये भारतीय महिला …

Read More »

डिआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत यांना एक वर्षाची मुदतवाढ लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्यानंतर डॉ समीर व्ही कामत यांनाही वाढ

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने २७ मे रोजी संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे अर्थात डीआरडीओ सचिव डॉ समीर व्ही कामत आणि संरक्षण संशोधन विकास संस्था (DRDO) चे अध्यक्ष यांना ३१ मे २०२५ पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ दिली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ३१ मे २०२४ पासून ३१ मे २०२५ अशी एक वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची …

Read More »

१० वीचा निकाल जाहिरः उतीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण वाढले, १.९८ टक्क्याने वाढ विभागीय निकालात कोकण पहिला, तर नागपूरचा सर्वात कमी

राज्यातील १० वी परिक्षेचा निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहिर केला. निकालात उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी १.९८ टक्क्याने निकाल वाढीव स्वरूपात लागला आहे. यंदाच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून ९९.१ टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूरचा अशून ९४.७३ …

Read More »