Breaking News

चंद्रयानानंतर आता सुर्य च्या अभ्यासासाठी इस्त्रोची आदित्य एल-१ स्वारी एका ठराविक अंतरावर थांबून करणार सुर्याचा अभ्यास

आंतरराष्ट्रीयस्तरावर अवकाश संशोधनात इतरांना जमले नाही. तो प्रयत्न इस्त्रोने करत चंद्र ग्रहाच्या पृष्ठभागावर नेमके काय याचा अभ्यास करण्यासाठी चंद्रयान-३ ही मोहिम आखत ती मोहिम यशस्वीपणे पूर्ण करत बहुप्रतिक्षित सुर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रोने आज आदित्य एल-१ या यानाला अंतराळात पाठविले. यानही यशस्वी सुर्यग्रहाच्या दिशेने झेपावले आहे.

सुर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-१ आज सकाळी साडे अकराच्या दिशेने सुर्याच्या दिशेने झेपावले. विशेष म्हणजे यानाने सुर्याच्या यशस्वी झेप घेतल्यानंतर इस्रोमध्ये काम करणाऱ्या शास्रज्ञाने यानाबरोबरील संपर्क कायम असल्याचे सांगत पुढील काही दिवसात अंतराळातील निश्चित अशा ठिकाणी आदित्य एल-१ पोहोचेल आणि तेथून सुर्याच्या अभ्यासाला सुरुवात करेल.

दरम्यान, इस्त्रोने चंद्रग्रहावरील चंद्रयान-३ उपग्रहाचे यशस्वी झाल्यानंतर साधारणत: प्रक्षेपण झाल्यानंतर लगेच इस्त्रोने आपल्या पुढील सुर्याची मोहिम हाती घेतली. आतापर्यत यानाचा प्रवास इस्त्रोने अपेक्षेनुसार सुरू आहे. त्यामुळे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे आणि संस्थेचे सर्वचस्थरातून अभिंदन होत आहे.

Check Also

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भारत निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *