Breaking News

मुकेश अंबानी यांच्याकडे या आहेत महागड्या कार! मुकेश अंबानी यांच्या ताफात या महागड्या गाड्याचा समावेश

मुकेश अंबानी यांनी त्यांच्या अथक मेहनतीने यश मिळवले आहे. वडिलांनी लावलेल्या इवल्याशा रोपाचे आज त्यांनी डेरेदार झाड उभे केले आहे. मुकेश अंबानी यांची जीवनशैली कोणापासून लपलेली नाही. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक अनेक आलिशान वाहनांचा समावेश आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये एकाचडी एक महागड्या कार आहेत. मुकेश अंबानींकडील सर्वात महागड्या कारमध्ये Rolls Royce Phantom आणि Cullinan चा समावेश आहे. येथे या दोन कारचा उल्लेख केला आहे

तसेच माध्यमांतील वृत्तांनुसार, या दोन्ही कारची किंमत जवळपास १३ कोटी रुपेय (ऑन-रोड) असल्याचे सांगण्यात येते. रॉल्स रॉयस कलिनन लक्झरी SUV आहे. ही कार अंबानी यांनी गेल्यावर्षीच अर्थात २०२२ च्या शुरुवातीलाच खरेदी केली आहे.याच बरोबर, मुकेश अंबानींकडे रोल्स रॉयस फॅंटम ड्रॉपहेड कूप देखील आहे. हिची किंमतही जवळपास १३ कोटी रुपये (ऑन-रोड, कस्टमायझेशनसह) सांगण्यात येते. या कारमध्येही जबरदस्त फीचर्स आहेत.

तसेच माध्यमांतील वृत्तांनुसार, गौतम अदानी यांच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस घोस्ट सीरीजही सामील आहे. संभाव्यतः ही त्यांची सर्वात महागडी कार आहे. हिचे एक्सटीरिअर आणि इंटीरिअर प्रीमियम आहे. यात ६. २-लीटर V१२ इंजिन आहे. जे ५२५० आरपीएमवर ५६३ एचपी आणि १५०० आरपीएमवर ७८० एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. भारतात हिची किंमत ६.९५ कोटी रुपयांपासून सुरू होते.

मात्र, वेगवेगळ्या कस्टमायझेशनसह हिची ऑन-रोड किंमत १० कोटी रुपयांच्या जवळपासही जाऊ शकते. ही कार केवळ ४. ८ सेकंदांत ताशी ० ते १०० किमी एवढा स्पीड धारण करू शकते. हीची टॉप स्पीड ताशी २५० किमी एवढी आहे.

Check Also

निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *