मागील काही महिन्यांपासून इस्त्रालयचे पंतप्रधान बेंज्यामिन नेत्यान्याहू यांच्या विरोधात वातावरण तापलेलं होतं. त्यामुळे नेत्यान्याहू यांना जनतेच्या रोषासमोर कायद्यातील बदलाच्या तरतूदींबाबत माघार घ्यावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र त्यातच पॅलेस्टाईनच्या हमास या लष्करी यंत्रणेकडून गाझापट्टीत अनेक क्षेपणास्त्र माऱ्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बेंज्यामिन नेत्यानाहू यांनी इस्त्रायलही या हल्ल्याला तोडीस तोड उत्तर देणार असल्याचे जाहिर करत आम्ही युध्दात (At War) आहोत असे जाहिर केले.
गाझापट्टी ही इस्त्रालय आणि पॅलेस्टाईन या दोन देशाला जोडणारा सीमावर्ती भाग आहे. या सीमावर्ती भागात दोन्ही देशांच्या सैन्यांकडून एकमेकांच्या विरोधात शत्रुत्व असले तरी या भागातील नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे म्हणून शस्त्रसंधी करण्यात आली होती. मात्र आज सकाळपासून पॅलेस्टाईनच्या हमास या लष्कराकडून नेमके क्षेपणास्त्र हल्ले सुरु केल्याने या भागातील तणावाला सुरुवात झाली.
तसेच पॅलेस्टाईनने रॉकेटने एकदमच अगणित हल्ले करायला सुरूवात केल्यानंतर एकदमच हवेतून आणि सैन्यही इस्त्रायलमध्ये घुसवायला सुरुवात केली. तसेच गोळीबारही सुरुच ठेवला.
त्यातच आता इस्त्रालयच्या पंतप्रधानांनीही प्रत्युत्तरादाखल हल्ला करायला सुरुवात केली आहे. या दोन्हीकडील हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान हमासने केलेल्या हल्ल्यात ५४५ जण जखमी झाल्याचा दावा इस्त्रालयच्या आरोग्य मंत्र्यांनी रॉयटर या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. तसेच २२ जण मृत्यूमुखी पडल्याचा दावा करण्यात आला.
तर पॅलेस्टाईनने इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यावर बोलताना दावा केला आहे की पॅलेस्टाईन देशालाही स्वतःच्या संरक्षणाचा अधिकार आहे.
इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्याचे वृत्त पसरताच पाश्चिमात्य देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.