Breaking News

परराष्ट्र मंत्री कसा असावा, उत्तम उदाहरण असणारे हेन्ऱी किसिंजर यांचे निधन

जगातील सर्वश्रेष्ठ शक्तीमान कोण हे ठरविण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमेरिका आणि तेव्हांच्या सोव्हिएत युनियन ऑफ रशियामध्ये शीतयुध्द सुरु झाले. नेमक्या त्याच कालावधीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री हेन्ऱी किसिंजर ही जोडगोळी अमेरिकेसह जगभरात आपल्या तिरकस बुध्दीमत्तेच्या आधारे अधिराज्य गाजवित होते. निक्सन यांचे सरकार वॉटरगेट प्रकरणामुळे पायउतार झाल्यानंतरही माजी राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत हेन्ऱी किसिंजर यांच्या सल्ल्याला सरकारमध्ये मोठे स्थान होते.

अशा मुत्सुदी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेन्ऱी किसिंजर यांचे आज वयाच्या १०० व्या वर्षी दिर्घ आजाराने अमेरिकेत निधन झाले.

भारत-पाक अशी फाळणी झाल्यानंतर कालांतराने पाकिस्तानातून बांग्लादेश निर्मितीसाठी लढणाऱ्या बंगाली स्वातंत्र्यसैनिकांना रसद पुरविण्याचे काम त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने स्विकारले होते. याचा सुगावा अमेरिकन गुप्तचरांना लागण्यानंतर अमेरिकेकडून बांग्लादेशाच्या निर्मितीत भारतीय सैन्य उतरल्याच अमेरिका आपले सैन्य पाकिस्तानच्या बाजूने उतरवेल अशी धमकी हेन्ऱी किसिंजर यांनी भारताला अर्थात पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दिली होती. तसेच भारतीय सैन्य बांग्लादेशात उतरविण्याआधी अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि हेन्ऱी किसिंजर यांच्यात एक बैठक झाली. त्यामुळे काही केल्या इंदिरा गांधी या अमेरिकेच्या दबावाला बळी पडत नाहीत म्हणून हेन्ऱी किसिंजर यांनी इंदिरा गांधी यांना उद्देशून ” Indians are B…h” अशी उपरोधिक शिवीही दिली होती.

बांग्लादेशच्या निर्मितीवरून भारत-पाकचे संबध ताणले गेल्यानंतर आणि भारताकडून त्या युध्दात उघडपणे उतरतोय असे दिसताच अमेरिकेने भारत सरकारला घाबरविण्याठी पश्चिम बंगालच्या उपसागरात अमेरिकन युध्दनौका उतरविली होती. परंतु इंदिरा गांधी या काही बधल्या नाहीत.

त्यानंतरही हेन्ऱी किसिंजर यांनी भारताला एकटं पाडण्याचा आणि आर्थिक निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला. तसेच रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज बुश पहिले आणि दुसरे, डोनाल्ड ट्रम्प आदी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात अमेरिकन सरकार हेन्ऱी किसिंजर यांच्या सल्ल्याला महत्व होते. याशिवाय लॅटीन अमेरिकेतील अनेक देश, आफ्रिका आणि युरोप खंडासह आशिया खंडातील भारत-पाक संबधात हेन्ऱी किसिंजर यांचा सल्ला नेहमीच शिरोधार्ह मानला गेला.

याशिवाय हेन्ऱी किसिंजर जितकी मुत्सुदी होते तितकेच तेच तत्वचिंतकही होते. आपल्या सरकारचा मुद्दा समोरच्या देशाच्या गळी कसा उतरावा यातील त्यांची मुत्सुदी गिरी कौतुकास्पद राहिली आहे. त्यामुळे काही वर्षापूर्वी हेन्ऱी किसिंजर यांनी स्वतःचे आत्मचरित्र लिहित परराष्ट्र मंत्री कसा असावा यासंदर्भातील अनेक किस्से अनुभव आणि चर्चांच्या फेऱ्या याबद्दलची सविस्तर माहिती त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात दिली. पण त्यांचा एखादा राजकिय विरोधक जर त्यांच्या दडपणाखाली येत नसेल तर कालांतराने त्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत असत.

Check Also

रोबोटने केली आत्महत्या ? दक्षिण कोरियातील घटना

दक्षिण कोरियातील एका सिव्हिल सर्व्हंट रोबोटने कामाच्या प्रचंड दबावामुळे ‘आत्महत्या’ केल्याची माहिती आहे. डेली मेलच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *