Breaking News

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, दिल्लीच्या दावणीला बांधून ठेवायला गुवाहाटीवरून आणले का? एक मंत्री हात झटकतात, तर दुसरे मंत्री दमबाजी करतात

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हटवून दिल्लीतील भाजपाच्या आर्शिवादाने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस-पवार महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या काराभारावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चांगलेच खडसावत दिल्लीच्या दावणीला बांधून ठेवायला गुवाहाटीवरून आणले का? असा सवाल विचारत चांगलेच कोंडीत पकडले.

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील विविध भरती परीक्षांमध्ये पेपरफुटी प्रकरण समोर येताना प्रश्न विचारले तर गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई पत्रकारांवर चिडतात, असा थेट आरोप करत तर शासकीय रुग्णालयात मृत्यू होतात त्याची आरोग्यमंत्री जबाबदारी झटकतात असा निशाणा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर साधला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात घडणाऱ्या घटनांसाठी आम्ही जबाबदार नाही म्हणत सरकारमधील सगळे मंत्री हात वर करून मोकळे होतात. पत्रकारांना जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्ही बांधील नाही म्हणत दम देतात. या मंत्रिमंडळातील मंत्री फक्त खुर्ची वर बसवून दिल्लीच्या दावणीला बांधून ठेवायला गुवाहाटी वरून आणले का ? असा सवालही केला.

जनतेची कामे करायची नाही, जबाबदारी घ्यायची नाही … फक्त दिल्लीची चाकरी करायची…. दावणीला बांधलेले बैलाबा सरकार महाराष्ट्राला नको अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, जयंत पाटील कोणाच्या संपर्कात माहित नाही

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *