Breaking News

राजस्थानात मुख्यमंत्री पदासाठी वसुंधरा राजेंना भाजपाकडून “साईडलाईन” ? नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

एकाबाजूला काहीही करून देशावरील भाजपाची अर्थात नरेंद्र मोदी यांची सत्ता अबादीत ठेवायची या उद्देशाने अनेक छोट्या-मोठ्या राजकिय पक्षात बंडखोरी आणण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरु आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावावर निवडणूका लढविण्याचा निर्णयही घेतला आहे. मात्र राजस्थानमध्ये भाजपाच्या वसुंधरा राजे यांना मात्र विधानसभा निवडणूकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रदेश भाजपाने सुरु केल्याने या सप्टेंबर महिन्यात मोदींपासून ते नड्डा यांच्यापर्यंत सात ते आठ राजकिय प्रचारसभा होणार आहेत. मात्र या सभांपासून वसुधंरा राजे यांना लांब ठेवण्यात आल्याने या निवडणूकीत वसुधंरा राजे यांना साईडलाईन करण्यात येत असल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

राजस्थानचा राजकिय इतिहास पाहिला तर अपवादत्मक स्थितीत सलग दोनदा संधी राजस्थानवासियांनी कोणत्याही राजकिय पक्षाला दिली नाही. त्यातच राजस्थानचे मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सध्या सुरु असलेला राजकिय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरकार पुन्हा राजस्थान परतणार नसल्याची शक्यता स्थानिक मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठी आतापर्यत दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या

वसुंधरा राजे यांना यावेळी मात्र भाजपाने मुद्दामहून लांब ठेवले आहे. आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर वसुधंरा राजे यांचा फोटो भाजपाकडून कोठेही सादा छापला जात नाही की त्यांच्या नावाचा उल्लेख केला जात नाही. परंतु भाजपाचा आतापर्यत निवडणूकांचे राजकारण पाहता भाजपाडून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव फायनल केले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नावावर निवडणूकांना सामोरे जाते. मात्र दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे यांना डावलल्याने भाजपाचा परंपरागत मतदार गेल्या वसुंधरा राजे कोणीकडे अशी विचारणा करत आहेत.

दरम्यान, यंदा राजस्थानच्या विधानसभा निवडणूकीत मीना या समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री पदासाठी ऐनवेळी पुढे आणले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वसुंधरा राजे यांना साईडलाईन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचा सवाल, मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण न्यायालयात टिकेल का?

मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे परंतु हे आरक्षण न्यायालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *