Breaking News

निवडणूक आयोगासमोरील आजचा युक्तीवाद पवार विरूध्द पवार चा अजित पवार गटाकडून शिवसेनेच्या निकालाचा संदर्भ

राज्याच्या राजकारणातील अभेद्य अशा पवार घराण्याचा प्रमुख सहभाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली. समर्थक आमदारांनी कोण कोणासोबत हे जाहिर केल्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नवी दिल्लीतील कार्यालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी वेळी अजित पवार गटाचे वकील महेश जेठमलानी आणि काही नेते उपस्थित होते. तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे जातीने हजर होते. यावेळी शरद पवार गटाची बाजू ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंग सिंघवी हे उपस्थित होते.

आज सुनावणीवेळी अजित पवार गटाच्या वकीलांनी दाखल केलेल्या अर्जानुसार युक्तीवाद केला. यावेळी अजित पवार गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी अजित पवार गटाची बाजू मांडताना अजित पवार यांच्या निवडीला पक्षातील अनेक, आमदार, खासदारांचा पाठींबा असल्याचे सांगत पक्षातील बहुसंख्य कार्यकर्त्येही अजित पवार गटासोबत असल्याचे सांगितले.

तसेच अजित पवार यांची करण्यात आलेली निवड ही सर्वर्था योग्य असून पक्ष आणि पक्षचिन्ह या गोष्टी अजित पवार गटाला मिळाल्या पाहिजेत अशी मागणी करत शिवसेनेतील फुटीसंदर्भात निकाल देताना ज्या पध्दतीने १९६८ च्या निकालाचा आधार घेण्यात आला. तोच आधार याप्रकरणी निकाल देताना करावा अशी मागणी केली.

तसेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी शरद पवार आणि जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदी करण्यात आलेली निवड ही चुकीच्या पध्दतीने केली. ही निवड करताना पक्षांतर्गत निवडणूका घेण्यात आले नसल्याचेही अजित पवार यांच्या गटाच्यावतीने भूमिका मांडण्यात आली.

दरम्यान, शरद पवार गटानेही निवडणूक आयोगासमोर आपले लेखी म्हणणे मांडत याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर अंतिम निर्णय घेण्याआधी आमचीही बाजू घ्या आणि आमची बाजू मांडल्यानंतर निर्णय द्यावा अशी मागणी करण्यात आली. या सुनावणीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जातीने उपस्थित होते.

अजित पवार गटाने त्यांच्या गटाची भूमिका मांडल्यानंतर अभिषेक मनुसिंग सिंघवी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, केवळ सोबत आमदार खासदारांचा पाठिंबा असल्याने पक्ष आणि पक्षचिन्ह दोन्ही कोणाला मिळत नाही. ते आमदार-खासदार झाले ते पक्षामुळेच. त्यामुळे त्यांनी काही तरी चुकीची खोटी कागदपत्रे मिळवून दावा केला आहे. त्यांच्या गटाने आज युक्तीवाद केला आहे. आता आम्हीही आमच्या काही गोष्टी प्राथमिकस्वरूपात आयोगासमोर ठेवण्यात आल्या आहेत. आम्हालाही युक्तीवादाची संधी मिळाल्यानंतर आमच्याकडील बाबी सविस्तर मांडू असे स्पष्ट केले. विशेष म्हणजे अभिषेक मनु सिंग सिंघवी हे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांच्यासोबत शरद पवार सोबतच होते.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *