Breaking News

सर्वोच्च न्यायालयाचा चंदिगढ प्रकरणी निकालः आपचा उमेदवार बनला महापौर

चंदिगढ महापालिकेच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणूकीत आम आदमी आणि काँग्रेस पार्टीचे उमेदवार कुलदीप कुमार यांना पडलेली मते वैध ठरवित निवडणूक अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक भाजपाच्या उमेदवारासाठी मतपत्रिकेवर चुकीच्या खाणाखुणा करत मत बाद ठरविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट करत निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांनी सांगितले.

भाजपाचे राजकिय कार्यकर्त्ये राहिलेले अनिल मसिहा यांना चंदिगढ महापालिकेच्या महापौर पदासाठीच्या निवडणूकीचे निवडणूक अधिकारी म्हणून जाणीवपूर्वक नेमण्यात आले. त्यानंतर अनिल मसिह यांनी जाणीवपूर्वक इतर पक्षाच्या मतदारांच्या मतपत्रिका जाणीवपूर्वक बाद करण्यासाठी चुकीच्या खुणा केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्या आप आणि काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाल्याचे जाहिर करत भाजपाच्या उमेदवाराला विजयी घोषित केल्याचे आपल्या निकालात सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांनी सांगितले.

तसेच अनिल मसिह यांनी जाणिवपूर्वक आम आदमी पार्टीची मते बाद झाल्याचे दाखविण्यासाठीच या गोष्टींचा हेतूपूर्वक करण्यात आल्याचे दिसते आहे. याप्रकरणात निवडणूक अधिकाऱ्याची संशयास्पद वागणूक स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे अनिल मसिह यांनी जे काही केले ते चुकीचे केल्याचा ठपकाही सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांनी ठेवला.

तसेच उपलब्ध झालेल्या सर्व पुराव्याच्या आधारे कुलदीप कुमार यांना पडलेली १२ मते आणि निवडणूक अधिकाऱ्याने बाद केलेली ८ मते विचारात घेतली तर कुलदीप कुमार यांना पडलेल्या मतांची संख्या भाजपाच्या उमेदवारापेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. तर भाजपाच्या उमेदवाराला फक्त १६ मते पडल्याचे दिसून येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी निवडणूकीबाबतच्या मुळ तत्वांनाच हरताळ फासल्याचे दिसत असल्याचे स्पष्ट करत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार कुलदीप कुमार हेच कायदेशीर महापौर होत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांनी सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *