Breaking News

‘फार्मसी’च्या विद्यार्थ्यांनाही आता ‘कॅरी ऑन’चा लाभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फार्मसी कौन्सिलकडील पाठपुराव्याला यश

फार्मसी पदविकेच्या ‘उन्हाळी परीक्षा २०२३’च्या प्रथम वर्षाचा निकाल अत्यंत कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत होते. याप्रश्नी लक्ष घालून काही तरी सकारात्मक तोडगा काढण्याचे साकडे राज्यातील फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे घातले होते. याप्रश्नी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने कार्यवाही करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यालयाकडे याविषयी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून फार्मसी पदविकेच्या प्रथम वर्षाच्या अनुतीर्ण विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’चा लाभ देत थेट दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याला फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे.
दरम्यान कालच २४ जुलै २०२३ रोजी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’चा लाभ देण्याचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने जारी केले आहे.

या निर्णयाचा राज्यातल्या हजारो फार्मसीच्या विद्यार्थ्याना लाभ होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व फार्मसी महाविद्यालयांसह विद्यार्थी व पालकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे शैक्षणिक कालावधी अत्यंत कमी मिळाला होता. फार्मसी पदविका अभ्यासक्रम वार्षिक असून फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या मानकानुसार हा कालावधी किमान १८० दिवसांचा असणे अपेक्षित होते. मात्र गतवर्षी हा कालावधी अवघा तीन ते चार महिने म्हणजे केवळ १०० ते १२० दिवस एवढाच मिळाला होता. याचा थेट परिणाम प्रथम वर्षाच्या निकालावर झाला होता. फार्मसीच्या पदविकेच्या ‘उन्हाळी परीक्षा २०२३’ चा निकाल पन्नास टक्याहून कमी लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यावर अतिरिक्त ताण येऊन त्यांच्यात नैराश्य वाढण्याची भिती होती. त्यामुळे याप्रश्नी काही तरी सकारात्मक तोडगा काढण्यासाठी फार्मसीच्या सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे साकडे घातले होते.

प्रश्नाचे गांभीर्य आणि विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयासोबत पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून कालच २४ जुलै २०२३ रोजी फार्मसी पदविकेच्या शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ मध्ये प्रवेशित असलेल्या आणि प्रथम वर्षाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना २०२३ – २४ मध्ये द्वितीय वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने तसे परिपत्रकसुध्दा जारी केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार असून विद्यार्थ्यांचे एका वर्षाचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य, माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी योगदान दिले. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत असून विद्यार्थी-पालकांसह फार्मसी शिक्षण संस्थांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यात आले.

Check Also

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *