Breaking News

मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इफ्तार पार्टी पार्टीला उद्योगपती, सिनेतारका, राजकारणी उपस्थित राहणार

मुंबई : प्रतिनिधी

आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत भाजपला विजय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने पुढाकार घेतला असून मुस्लिम समाजबांधवाचा पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंच या संघटनेच्यावतीने मुंबईत पहिल्यांदाच रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. ही इफ्तार पार्टी ४ जून रोजी मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातले उद्योगपती आणि कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती मंचचे राष्ट्रीय संयोजक लतीफ मुकादम यांनी दिली .

गेल्या वर्षांपासून मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या वतीने उत्तरप्रदेश ,दिल्ली या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे .मात्र यावेळी पहिल्यांदाच मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. याशिवाय मुस्लिम राष्ट्रांचे काही राजदूतही या इफ्तारला उपस्तिथ राहणार आहेत . या कार्यक्रमाला मुंबईतील शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी ही उपस्थित राहणार असून मुस्लिम समुदायाला नव्या विचारसरणीकडे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे मुस्लिम समुदाय संशयाच्या नजरेतून पाहत होता. मात्र आता या समाजातल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. विविध क्षेत्रातील जवळजवळ ३०० मान्यवर या इफ्तारला येणार असून यावेळी सामाजिक सलोख्यावर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले . तसेच शैक्षणिक विषयावरही यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. मुस्लिम समाज आतापर्यंत भाजपपासून दूर  राहण्याचा प्रयत्न करत होता. या समाजाचा नेहमी राजकीय लाभासाठी अनेक पक्षांनी वापर केला आहे. पण विकासाच्या मार्गाने समाजाची राजकीय शक्ती वाढवण्याचा प्रयत्न मुस्लिम राष्ट्रीय  मंच करत असल्याचे ही मंचचे पदाधिकारी इरफान पिरजादे यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *