Breaking News

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया… निकालाची कागदपत्रे हाती आल्यानंतर बोलेन

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घेण्यासंबधी वेळेची मर्यादा दिलेली नाही याचा अर्थ न्यायालयाचा अवमान करणे असा होत नाही अशा कडक शब्दात आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुनावलं आहे यावर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काहीही निर्णय घेत नाहीत या प्रकरणी ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलंच सुनावलंय.

गेल्या आठवड्यात १४ सप्टेंबरला आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करताना राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाला कागदपत्रांसाठी एका आठवड्याची वेळ वाढवून दिली. प्रकरणाची दोन आठवड्यानंतर सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं. एकूण ४० याचिका समोर असून कागदपत्रांची छानणी व्यवस्थित व्हावी असं विधानसभा अध्यक्षांकडून कारण देण्यात आलं होतं.

राहुल नार्वेकरांनी दोन आठवड्यांनी सुनावणी पुढे ढकलल्यानंतर त्यावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असतानाही, अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप अॅड. असीम सरोदे यांनी केला होता. कदाचित त्यांना वरून काही आदेश आले असतील, त्यामुळे त्यांनी ही सुनावणी पुढे ढकलली असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा दिलेली नाही याचा अर्थ तुम्ही न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान करा असं होत नाही. अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्देशांचा आदर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत यावर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला आहे. यासंबधीचे कागदपत्र अद्यापही माझ्याकडे आलेली नाहीत. कागदपत्र पाहिल्या शिवाय यावर काही बोलता येणार नाही. आमच्या समोर ज्या याचिका आहेत त्यावर नियमानूसार सुनावणी घेण्यात येईल.

Check Also

श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *