Breaking News

प्रकाश आंबेडकर म्हणाले, …लाखो मते मिळवले पण चर्चेला बोलावतच नाही इंडिया आघाडीच्या बॉयकॉटवर आंबेडकरांची प्रतिक्रिया

इंडिया आघाडी (IndiaAliance) ने काही निवडक चॅनल्स आणि अँकरच्या चर्चासत्रात प्रवक्ते न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मीडियावर घातलेल्या या बहिष्कारावर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्थापित राजकीय पक्ष आणि मीडियावर टीकास्त्र सोडले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, एकीकडे इंडिया अलायन्स (IndiaAliance) मीडियावर घातलेल्या बहिष्काराची चर्चा सुरू असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांना चॅनल्स कडून चर्चासत्रात बोलावलेच जात नसल्याची वस्तुस्थिथी मांडली.

या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इंडिया अलायन्स (IndiaAliance) कडे टेलिव्हिजनवरील चर्चासत्रावर बहिष्कार घालण्याची सोय आहे. आम्ही २०२९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे ४१ लाख आणि २५ लाख मते मिळवली आणि आमच्या आकांक्षा आणि मुद्द्यांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष करून आम्हाला वंचित ठेवणार्‍या पक्षांची दुकाने हादरवून टाकली. आणि तरीही मीडिया आमच्या प्रवक्त्यांना चर्चेसाठी आमंत्रित करत नाही, असे नमूद केले.

तसेच ट्विट मध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्हाला @VBAforIndia वंचित आणि बहुजनांचा आवाज ठळकपणे मुख्य प्रवाहातील माध्यमात मांडता येऊ नये केवळ या हेतूने आमंत्रित केले जात नाही. हे वास्तव आहे!, अशी खरपूस टीका केली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, जयंत पाटील कोणाच्या संपर्कात माहित नाही

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *