Breaking News

अजित पवार गटांकडून जंयत पाटील कार्यमुक्तः पाटील, आव्हाड यांच्या अपात्रतेसंद्रर्भात तक्रार शरद पवार यांनी केली प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची हकालपट्टी

रविवारी २ जुलै रोजी अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी पक्षाची परवानगी न घेता राजभवनावर जाऊन थेट उपमुख्यमंत्री पदाची आणि मंत्री पदाची शपथ घेतली. तसेच या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार सुनिल तटकरे आणि नव्याने कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आलेले प्रफुल पटेल हे ही पक्षाची परवानगी न घेता हजर राहिले. त्यामुळे अजित पवार यांच्यासह ९ आमदारांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रितसर तक्रार करत पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्र ठरविण्याची मागणी केली. तर सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांना पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा शरद पवार यांनी केली.

या हक्कालपट्टीच्या कारवाईला आणि अपात्रतेच्या तक्रारीला उत्तर देण्यासाठी आज अजित पवार यांच्या गटाकडून पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे प्रफुल पटेल यांनी जाहिर करत त्यांच्या जागी सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे जाहिर केले.

याशिवाय प्रफुल पटेल म्हणाले की, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी माजी नियुक्ती कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्या अधिकारांतर्गत प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सुनिल तटकरे यांनी आज आणि आता स्विकारावी अशी सूचना केली. त्यानंतर सुनिल तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदाभार स्विकारत असल्याचे जाहिर करत महिला प्रदेशाध्यक्ष पदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे जाहिर केले.

तत्पूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी सुनिल तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीला अनुमोदन दिले.

तसेच प्रफुल पटेल यांनी अनिल पाटील हे पूर्वीही पक्षाचे प्रतोद म्हणून कार्यरत होते. यापुढेही ते पक्षाचे प्रतोद म्हणून कार्यरत राहतील असे जाहिर केले. तसेच जे कोणी पक्षात फूट पडल्याचे सांगत आहेत. त्यांना कोणाच्याही नियुक्त्या रद्द करण्याच्या आणि नव्या नियुक्त्या करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.

यावेळी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मग शरद पवार यांच्यासोबत राहिलेल्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करणार का असा सवाल करताच अजित पवार म्हणाले, आम्ही पक्ष वाढविण्यासाठी सरकारमध्ये सहभागी झालोय की हक्कालपट्टी करण्यासाठी इथे आलोय असा प्रति सवाल करत राष्ट्रवादी पक्षानेच निर्णय घेतल्यानेच मी इथे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच सगळ्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याची ग्वाही देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या ज्या कामांना स्थगिती देण्यात आली ती उठवून ती कामे सुरु कऱण्याला आमचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.

तसेच राष्ट्रीय अध्यक्ष नवा निवडणार का असा सवाल विचारला असता अजित पवार म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार आहेत हे विसरलात की काय असा प्रति सवाल करत शरद पवार यांच्याच विचारानुसार आम्ही चालत असल्याचे सांगितले.

तसेच शेवटी अजित पवार म्हणाले की, विरोधी पक्षनेते ठरविण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आणि ज्याची संख्या जास्त तो विरोधी पक्षनेता होतो. आता पक्षच सरकारमध्ये सहभागी झाल्यावर पक्षाचा विरोधी पक्षनेता कसा होऊ शकतो असा सवाल करत जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरविण्यासंदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली असल्याचेही सांगितले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *