Breaking News

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा इशारा, कंत्राटी जीआर रद्द न झाल्यास राज्यभरात आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मुंबईत निदर्शने

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कंत्राटी नोकर भरतीला काँग्रेससोबतच राष्ट्रवादीनेही तीव्र विरोध केला आहे राज्य सरकार आता कंत्राटी पद्धतीवर अनेक विभागातील पदे भरणार आहे. या निर्णयाचा निषेध करीत या संदर्भातील शासन निर्णयाची युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख व प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वात प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करीत होळी करण्यात आली जीआर रद्द न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख यांनी यावेकी बोलतां दिला

सरकारने जो कंत्राट जीआर काढला आहे. तो तरूणांचे रोजगार धोक्यात घालणारा आहे. तरुण पिढीच्या भविष्यासोबत राज्य सरकार खेळत आहे. त्यामुळे या जीआरची आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने होळी करण्यात आली आहे असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख म्हणाले. राज्य सरकारने हा जीआर तातडीने रद्द करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

हे कंत्राट कुणासाठी काढले आहे. क्रिस्टल कंपनी कुणाची आहे. कोणाला लाडाने प्रसाद दिला आहे असा सवाल शेख यांनी यावेळी बोलताना केला . भाजपच्या लोकांच्या हातात तुम्ही तरूणाचे भविष्य देत आहात. याचा आम्ही निषेध करतो. हा जीआर ६ स्ंप्टेबर २०२३ ला काढला आहे. या दिवशी गद्दार लोकांचे सरकार होते. त्यांनी हा जीआर रद्द करावा. भाजपने सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणार, सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणार ,असे म्हटले होते. मात्र सरकार रोजगार आणि सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यापेक्षा आता कंत्राटी पद्धतीवर नोकऱ्या देत आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य तरुणाचे स्वप्न राज्य सरकारने पायाखाली तुडवले आहे. हे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्यांचे सरकार नाही असा घणाघात देखील महबूब शेख यांनी यावेळी बोलताना केला .

महाविकास आघाडी सरकार असताना शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या होत्या. हे भाजपा नेत्यांना खुपल्यामुळे त्यांनी राज्यातील सर्वसामान्यांची सरकार असलेले महाविकास आघाडी सरकार पाडली. जर हा जीआर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात निघाला असता तर भाजपने मोठे रान पेटवले असते. मात्र आता भाजपा नेते गप्प आहे. भाजपाची नीती सर्वसामान्य जनतेसाठी नसून उद्योगपती आणि कंत्राटदार यांना मोठी करण्याची आहे, असे देखील यावेळी महबूब शेख म्हणाले.

अजित दादा असे म्हणत असतील कि माजी आमदार यांचे पगार बंद करा. अशा कंत्राटी नोकऱ्या लागल्या तर त्यांची लग्न होणार नाही. परमनंट नोकऱ्या द्या. तुम्हाला युवकांचे हीत लक्षात घ्यायच असेल तर हा जीआर रद्द करा लागेल अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यभर राज्य सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल या सर्वाला राज्य सरकार जबाबदार असेल असे देखील यावेळी महबूब शेख यांनी म्हटले आहे.

यावेळी पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल ,नवी मुंबई युवक अध्यक्ष अन्नू आंग्रे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अमोल मातेले, प्रदेश सचिटणीस उमेश अगरवाल, प्रदेश सचिव गुरुज्योत सिंग किर, पनवेल युवक अध्यक्ष शाहबाझ पटेल, प्रदेश सरचिटणीस नाजेर शेख, आदित्य जनोरकर यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *