Breaking News

आयपीओतून कमाईची संधी मिळणार चालू आठवड्यात १० आयपीओ उघडणार

आयपीओ गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. याचे कारण म्हणजे १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात १० नवीन आयपीओ उघडणार आहेत. या आयपीओच्या माध्यमातून २४०० कोटी रुपये उभे केले जाणार आहेत.

या आठवड्यात साई सिल्क कला मंदिर आणि सिग्नेचर ग्लोबल इंडियाचे आयपीओ २० सप्टेंबर रोजी उघडतील. दोन्ही आयपीओ २२ सप्टेंबर रोजी बंद होतील. साई सिल्क कला मंदिरने आयपीओसाठी किंमत बँड प्रति शेअर २१०-२२२ रुपये निश्चित केली आहे. रिअल इस्टेट डेव्हलपर सिग्नेचर ग्लोबल इंडियाच्या ७३० कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये ३६६-३८५ रुपये प्रति शेअर किंमत बँड आहे. मनोज वैभव जेम्स एन ज्वेलर्सचा आयपीओ २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान खुला असेल. यामध्ये किंमत २०४-२१५ रुपये प्रति शेअर आहे.

मधुसूदन मसाला, टेक्नोग्रीन सोल्युशन्स आणि मास्टर कॉम्पोनंट्सचे आयपीओ १८ सप्टेंबर रोजी उघडेल आणि २१ सप्टेंबर रोजी बंद होईल. मधुसूदन मसाला आयपीओमध्ये किंमत बँड ६६-७० रुपये, टेक्नोग्रीन सोल्युशन्सच्या १६.७२ कोटींच्या आयपीओसाठी किंमत बँड ८६ रुपये प्रति शेअर तर मास्टर कॉम्पोनंट्सच्या १५.४३ कोटींच्या आयपीओसाठी किंमत बँड १४० रुपये आहे.

याशिवाय हाय-ग्रीन कार्बन, मंगलम अलॉयज आणि मार्को केबल्स आणि कंडक्टर्सचे आयपीओ २१ सप्टेंबरला उघडतील आणि २५ सप्टेंबरला बंद होतील. हाय-ग्रीन कार्बनच्या आयपीओसाठी किंमत बँड ७१-७५ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. तर मंगलम अलॉयज आणि मार्को केबल्स आणि कंडक्टर्सच्या आयपीओसाठी अनुक्रमे ८० रुपये आणि ३६ रुपये किंमत बँड असेल. ऑरगॅनिक रिसायकलिंग सिस्टीम्सचा ५० कोटी रुपयांचा आयपीओ २१ ते २६ सप्टेंबर दरम्यान खुला असेल.

दरम्यान, सामही हॉटेल्स, जगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस आणि यात्रा ऑनलाइन आयपीओ १४ सप्टेंबर रोजी उघडले आहेत. सामी हॉटेल्स आणि जगलचा आयपीओ १८ सप्टेंबर रोजी तर यात्रा ऑनलाइनचा आयपीओ २० सप्टेंबर रोजी बंद होईल. याशिवाय, हॉलमार्क ऑप्टो-मेकॅट्रॉनिक्स, सेलेकोर गॅझेट्स आणि कोडी टेक्नोलॅबचे आयपीओ २० सप्टेंबर रोजी बंद होतील.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

EPFO ने दिली पेन्शन धारकांना खुषखबरः वाढीव पेन्शन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व निवृत झालेल्या कामगारांना जास्तीची पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *