Breaking News

२५ व्या वर्षाच्या पदार्पणात शरद पवार यांनी सोपविली राष्ट्रवादीची सुत्रे सुप्रिया सुळेंकडे सुळेंच्या मदतीला महाराष्ट्रातून प्रफुल पटेल, जितेंद्र आव्हाड, सुनिल तटकरे यांच्यासह अन्यांचा राष्ट्रीय कार्यकारणीत समावेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतीच २४ वर्षे पूर्ण होत २५ व्या वर्षात आज पदार्पण केले. या दिवसाचे औचित्य साधत शरद पवार यांचा पक्ष संघटनेत उत्तराधिकारी कोण अशी चर्चा पक्षात रंगली होती. तसेच शरद पवार यांच्या पक्षाध्यक्ष पदावरून स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय जाहिर केल्यानंतर जी काही पक्षातील कार्यकर्त्यांची भावनेचा उद्रेक झाला. त्यावेळी पवारांच्या उत्तराधिकारी म्हणून पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे आले होते. त्यानुसार नवी दिल्लीत झालेल्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अपेक्षेप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे जाहिर केले. तसेच त्यांच्या मदतीसाठी म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यांवर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची घोषणा केली.

या शिवाय शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या तीन राज्यांचे प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे युवा, महिला, विद्यार्थ्यांची आघाडी बांधण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. याशिवाय पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक समितीच्या चेअरमन पदाचीही जबाबदारी सोपवित पक्षाची प्रमुख धुरा सुप्रिया सुळे यांच्या हाती घट्ट राहिल अशा पध्दतीने जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तसेच पक्षाचे प्रफुल पटेल यांच्यावरही कार्याध्यक्ष पदावर वर्णी लावण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडे फक्त राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड, सुनिल तटकरे, यांच्यासह इतर राज्यातील नेत्यांनाही राष्ट्रीयस्तरावरच्या पक्ष संघटनेत जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, दिल्लीतील या संपूर्ण कार्यक्रमात अजित पवार हे काळा गॉगल डोळ्यावर चढवून सबंध कार्यक्रम होईपर्यंत वावरले. यामुळे शरद पवार यांनी अजित पवार यांना बाजूला सारत आपली कन्या सुप्रिया सुळे यांना आपले वारसदार नेमल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे. या प्रश्नांची उत्तर खुद्द शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निर्णयाबद्दल माहिती देताना सांगितले की, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी लोकांची मागणी होती. लोकाग्रहास्तव खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याध्य़क्षपदी नियुक्ती करण्यात आली. सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या खांद्यावर महाराष्ट्रासह, हरियाणा आणि पंजाब या राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये पक्षाची ताकद वाढावी म्हणून हा बदल करण्यात आल्याचे पवार म्हणाले. लोकांना परिवर्तन हवं आहे, असेही ते म्हणाले.

पक्षात एकाच वेळी दोन कार्याध्यक्ष का नेमले गेले, असा सवाल शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना पवार म्हणाले की, ‘देशाचा मोठा विस्तार लक्षात घेऊन दोन कार्यकारी अध्यक्ष नेमले गेले आहेत. तसेच ही निवड करताना कुठला निकष लावला गेला असाही प्रश्न त्यांना विचारला गेला. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, अनेक लोकांची तशी मागणी होती म्हणूनच दोन कार्याध्यक्ष निवडले गेले. कार्यकारी अध्यक्षांचे पद किती काळासाठी असणार? पदाची कालमर्यादा निश्चित केली आहे का? या प्रश्नावर शरद पवार यांनी म्हटले की, यासाठी आधी पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करावी लागेल. त्यासाठी पक्षाची बैठक बोलावून त्याबाबतचा बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी आरक्षण फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *