Breaking News

भुजबळ म्हणाले, राणाने लकडावालाकडून ८० लाख घेतल्याचा तपास पोलिसांबरोबर ईडीनेही करावा संजय राऊत यांच्या मागणीला दिला दुजोरा

नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला या दाऊदच्या माणसाकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याचा तपास मुंबई पोलिसांनी व ईडीनेही करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रतिज्ञा पत्रातील माहिती उघड करत डी-कंपनीशी संबधित असलेल्या लकडावाला याच्याकडून राणा यांनी ८० लाख रूपये घेतल्याचे त्यात लेखी माहिती देण्यात आली.
आज जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी राणा दांपत्याचा चांगलाच समाचार घेतला.
मंत्री नवाब मलिक यांनी ५ लाखाचा जमीन व्यवहार केला त्याच्यावर ईडीने कारवाई केली. ते दाऊदच्या माणसाकडून खरेदी केली असं म्हणतात परंतु ते कुठेही काही दिसत नाही. मात्र नवनीत राणा यांनी सरळसरळ ८० लाख रुपये घेतले आहेत याची कागदपत्रे खासदार संजय राऊत यांनी दिली आहेत असेही ते म्हणाले.
नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपये घेतले ते कशासाठी घेतले, कुणाच्यावतीने घेतले याचीही मुंबई पोलिसांनी व बाकीच्या यंत्रणांनीही चौकशी करायला हवी अशी मागणी करत नवनीत राणा या मागासवर्गीय आहेत याबाबत उच्च न्यायालयाने नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या मागासवर्गीय नाहीत असं उच्च न्यायालय बोलत आहे. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. मुळात त्या मागासवर्गीय आहेत का हे प्रश्नचिन्ह असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवनीत राणा आमच्यावर अन्याय केला असं बोलत आहेत. काय अन्याय केला असा सवाल करतानाच तुम्ही दिवसभर काय करत होतात हे सर्वांनी पाहिले आहे असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
पोलीस ठाण्यात अन्याय झाला म्हणतात मग पोलिसांविरुद्ध त्यांची तक्रार नाही असे पोलीस रेकॉर्ड मध्ये नमूद असल्याचे पत्र छगन भुजबळ यांनी दाखवतानाच मग यांच्यावर अन्याय काय झाला असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *