Breaking News

राज ठाकरेंचे पत्र, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उध्दव ठाकरे तुम्हीही मनसैनिकांना बजावलेल्या नोटीसा आणि तडीपारीवरून राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील मस्जिदींवरील भोंग्याच्या प्रश्नावरून राज्यातील मनसैनिकांना पोलिसांनी तडीपारीच्या नोटीसा आणि अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर अखेर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खोचक इशारा देत कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उध्दव ठाकरे तुम्हीही नाही असे सांगत गर्भित इशारा दिला.
मस्जिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि राज्यातील उच्च न्यायालयांनी पूर्वी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या मनसैनिकांनी ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरु करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार मनसैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधकात्मक नोटीसा बजाविल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगांत डांबल. कशासाठी? ध्वनी प्रदुषण करणारे, लोकांना त्रास मस्जिदीवरचे अनधिकृत भोंगे उतरले जाऊ नयेत यासाठी अशी खोचक टीका त्यांनी केली.
गेला आठवडाभर मनसैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पध्दतीने पोलिस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की, मस्जिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहिम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबविली होती का? असा सवाल करत आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलिस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत अशी टीकाही त्यांनी केली.
मनसैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत असल्याचे सांगत राज्य सरकारला माझं एकचं सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उध्दव ठाकरे तुम्ही सुध्दा नाही असा गर्भित इशाराही त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला.
दरम्यान, राज्यातील मनसैनिकांवर पोलिसांनी कारवाया पूर्णपणे केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र दुसऱ्याबाजूला राज्यातील मस्जिदींमध्ये अतिरेकी आणि शस्त्रास्त्रे असल्याचा दावा केला. त्यामुळे याप्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण तापणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.

Check Also

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *