Breaking News

कर्नाटकात लोकशाहीचा मोठा विजयाने देशातील राजकीय चित्र पालटणार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आशावाद

मुंबई : प्रतिनिधी

लोकशाही धाब्यावर बसवून बळकावलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री पद भारतीय जनता पक्षाला अखेर सोडावे लागले असून, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी केलेल्या खटाटोपातून भाजपचा लोकशाहीविरोधी चेहरा समोर आला असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन देशभरातील राजकीय चित्र पालटणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

कर्नाटकातील घटनाक्रमावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, कर्नाटकचे विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११६ आमदारांची यादी राज्यपालांकडे सादर केली. परंतु, राज्यपालांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय न घेता कागदावरसुद्धा बहुमत नसलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेची संधी दिली. भाजपने केवळ १०४ आमदारांची यादी दिली होती. तरीही राज्यपालांनी घेतलेल्या या निर्णयामुळे घोडेबाजाराला चालना मिळून लोकशाहीचे धिंडवडे निघणार होते. परंतु, सरतेशेवटी भाजपचा घोडेबाजारही यशस्वी झाला नाही आणि येडीयुरप्पांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर आता तेथील राज्यपालांना एक क्षणभरही पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *