Breaking News

जयंत पाटील म्हणाले, संविधानासंदर्भात प्रबोधन करण्याची वेळ आली

भारताच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न जेवढा महत्त्वाचा आहे. तेवढेच या देशातील सर्वसामान्य माणसांचे अधिकार देखील महत्त्वाचे आहे. आज भारतामध्ये सर्वसामान्य माणसांचे अधिकार ज्या उद्दिष्टाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जन्माला घातलेल्या अधिकारांवर मर्यादा येत आहे असा एक साधारणपणाने समज या देशातील जनतेचा गेल्या काही वर्षात होत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात देशाचा प्रजासत्ताक दिन प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते झेंडा फडकवून साजरा करण्यात आला.

जयंत पाटील म्हणाले की, या देशांमध्ये व्यक्ती स्वातंत्र टिकलं पाहिजेत या देशात प्रत्येक माणसांना ज्या पद्धतीने जगायचं हे त्याचा तो हक्क आहे. त्यासाठीच प्रजासत्ताक दिनाने आपल्याला काय दिलं आहे याची उजळणी होणं देखील आवश्यक आहे. आज देशामध्ये संविधान बचावाचा नारा सर्व जण देत आहे. हे संविधान तुम्हा आम्हा सगळ्यांना या देशाची घटना दिली. संविधानाच्या माध्यमातून इतके वर्ष या देशात काम करत आलो आहे. त्यामध्ये कधीही कोणी गदा आणली नाही. कुणावरही वागण्यावर आणि बोलण्यावर मर्यादा आल्या नाही पण अलीकडच्या काळामध्ये या देशांमध्ये सर्वांनाच मर्यादा या लागल्या आहे. त्याचबरोबर न्याय व्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्था यांच्या अधिकाऱ्याची मर्यादा अधिक गडद व्हायला लागली आहे. न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला न्याय मिळणार की नाही याची सामान्य माणसांना चिंता वाटत आहे असे सांगितले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, धर्मनिरपेक्षता या देशाच्या विविधतेला संरक्षण देणारी बाब होती. आज या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात सर्वांना प्रगतीचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला आहे. व्यक्तीच्या प्रगतीमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. म्हणून व्यक्ती स्वातंत्रतेचा आपल्या संविधानामध्ये मोठा भाग आहे. व्यक्तीचे स्वातंत्र्य त्याच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा असलं पाहिजे असा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेळेपासून झाला. आज मात्र त्या सर्वांच्यावर हा देश सर्वधर्म भाव हा पाडणारा होऊ शकत नाही तो शब्दच घटनेतून आणि संविधानातून काढण्यात आला असल्याने हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी चिंतेची बाब असल्याचे मतही व्यक्त केले.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, २६ जानेवारी निमित्त संविधान बचाव हा नारा हळूहळू बुलंद होत आहे. लोकांना काळजी वाटू लागली आहे. २६ जानेवारीच्या दिवशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपलं संविधान टिकलं पाहिजे वाचलं पाहिजे त्यात बदल आपल्या जनतेने सहन केले नाही पाहिजेत. या दृष्टीने आपण सर्वांनी जनतेपर्यंत पोहोचून सामान्य माणसांना संविधान आणि संविधानाने दिलेले जे अधिकार आहे. त्याची जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन सांगितले पाहिजे. जनतेला पुन्हा एकदा ७५ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त संविधानासंदर्भात प्रबोधन करण्याची वेळ आली असल्याचेही सांगितले.

जयंत पाटील म्हणाले की ,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आयुष्यभर ही भूमिका स्वीकारली पाळली त्याचा पालक पोषण विचारांचा करण्याचा प्रयत्न केला. त्या विचारांच्या मागे तुम्ही सर्वजण आहात. पवार साहेबांनी या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलेलं ते संविधानाचा आदर ठेवून या देशाच्या सगळ्या शेवटच्या माणसाला संरक्षण देण्याची भूमिका आहे ती केव्हाही शरद पवार साहेबांनी क्षणभरही ढवळी दिली नाही. त्या भूमिकेशी आपण सर्वजण एकरूप होऊन काम करणार असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार व कोषाध्यक्ष हेमंत टकले, पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस व प्रवक्ते नसीम सिद्दीकी, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहदी, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, आमदार सुनील भुसारा, मुंबई प्रदेश अध्यक्षा राखीताई जाधव, दक्षिण मुंबई विभागीय जिल्हाध्यक्ष रुपेश खांडके, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, मुंबई युवक अध्यक्ष अमोल मातेले, सेवा दलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जानबा म्हस्के, सेवा दलचे मुख्य प्रशिक्षक गिरीश सावंत, सेवा दलचे मुख्य संघटक महेश शिरसाठ, मुंबई सेवा दलचे अध्यक्ष दिपक पवार व डिजिटल मीडिया रिसर्च अँड कम्युनिकेशन विभागाचे राज्यप्रमुख नीरज महांकाळ यांसह इतर मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *