Breaking News

दिल्लीत जन्मलेले पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन कारगिल युध्द आणि नवाज शरीफ यांच्या पदच्युत केले होते

जून्या दिल्लीत जन्मलेले आणि भारत-पाकिस्तान फाळणीच्या कालावधीत पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत झालेले माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे दुबईतील एका रूग्णालयात आज निधन झाल्याची माहिती पुढे येत आहे.

पाकिस्तानात पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सरकार स्थानापन्न असताना शरीफ यांचे सरकार उलथवून टाकत परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानची सत्ता हस्तगत केली. त्यानंतर भारत-पाक दरम्यान कारगिल युध्दासाठी कारणीभूत ठरले होते. त्यानंतर २००१ ते २००८ असे आठ वर्षे मुशर्रफ हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून राहिले. त्यावेळी भारतात पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार होते. याच काळात भारत-पाकिस्तान दरम्यान काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी आग्रा येथे लष्करप्रमुख मुशर्रफ- पंतप्रधान वाजयेपी यांची भेट झाली होती. तसेच या दोघांमधील झालेल्या समेटनुसार भारत-पाक दरम्यान समझौता एक्सप्रेसही सुरु करण्यात आली होती.

२०१६ पासून ते दुबई येथे स्थायिक झाले होते. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाल्यामुळे त्यांना पाकिस्तान सोडावे लागले होते. दुबईमधील रुग्णालयात त्यांचे निधन झाले असल्याची बातमी पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने समोर येत आहे. गेले अनेक दिवस दुबईमधील रुग्णालयात ते उपचार घेत होते.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना परवेज मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाची आगळीक केली होती. भारतीय सैनिकांनी कारगिल युद्धात असीम शौर्य दाखवले होते. तर याच युद्धाला मुशर्रफ यांचे कट कारस्थान म्हणून ओळखले जाते. आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी मुशर्रफ यांनी कारगिलचे युद्ध छेडले होते. आपले आत्मचरित्र “इन द लाइन ऑफ फायर” यामध्ये त्यांनी या युद्धाबाबत लिहिले की, पाकिस्तानी सैन्य युद्धात सहभागी होते, मात्र हे सत्य आम्ही लपवले. या युद्धातील पराभवाचे खापर मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर फोडले होते.

तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी मुशर्रफ यांना लष्कर प्रमुख पदावरुन हटविले होते. त्यांच्या जागी जनरल अजीज यांना लष्कर प्रमुख बनविण्यात आले. मात्र जनरल अजीज हे परवेज मुशर्रफ यांचे विश्वासू सहकारी आहेत, याची नवाज शरीफ यांना कल्पना नव्हती. अखेर परवेज मुशर्रफ यांनी लष्कराच्या बळावर सत्ता काबिज करुन नवाज शरीफ यांना सत्तेबाहेर काढले.
परवेज मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ साली दिल्ली येथे झाला होता. १९४७ साली फाळणीदरम्यान त्यांचे कुटुंब दिल्लीहून कराची येथे स्थायिक झाले होते. १९७४ साली मुशर्रफ पाकिस्तानी सैन्यात रुजू झाले होते. त्यांनी २००१ ते २००८ या काळात त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, जयंत पाटील कोणाच्या संपर्कात माहित नाही

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *