Breaking News

पुणे जिल्ह्यातील पोट निवडणूकीवरून अजित पवार म्हणाले, बिनविरोध होण्याचे कारण काय? पंढरपूर, कोल्हापूर, नांदेड येथील निवडणूक बिनविरोध झाली नव्हती

राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही उतरण्याची तयारी महाविकास आघाडीकडून करण्यात येत असतानाच आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला आवाहन केले. यापार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांशी याबाबत चर्चा देखील केली. त्यामुळे महाविकास आघाडी उमेदवार देणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, यावेळी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचे कारण नाही. लोकशाही आहे, असे सांगत या दोन्ही जागा महाविकास आघाडी लढविणार असल्याचे स्पष्ट केले.

अजित पवार हे आज ५ फेब्रुवारी रोजी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. त्यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका जाहिर केली.
यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचे काही कारण नाही. त्यांनी कोल्हापूर, पंढरपूर, देगलूर येथील पोटनिवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. मुंबई येथील अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार दिला नाही, म्हणजे बाकीच्या सर्व निवडणुका बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढावं असा खोचक टोला भाजपा-शिंदे गटाला लगावत ते पुढे म्हणाले शेवटी लोकशाही आहे. जनता ज्यांना निवडून द्यायचे, त्यांना निवडून देईल, असे स्पष्ट केले.

दुसरीकडे कसबा पेठ आणि चिंचवड या जागांवरील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी याबाबत बातचित केली आहे. अनेक ठिकाणी आमदारांचे दुःखद निधन होते. त्यानंतर त्या जागेवरील पोटनिवडणुकीमध्ये विरोधक आपला उमेदवार उभा करत नाहीत. तेथील निवडणूक बिनविरोध केली जाते. तशी परंपरा आहे. अंधेरीमध्येही नुकतेच पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन दिले होते. त्यांच्या या आवाहनाला आम्ही प्रतिसाद दिला होता. त्यानंतर अंधेरी येथील निवडणूक बिनविरोध झाली होती. हीच परंपर सर्वांनी जपावी म्हणूनच चिंचवड, कसबा येथील पोटनिवडणुकीसाठी मी त्यांना विनंती केल्याचे सांगितले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *