Breaking News

सुप्रिया सुळे यांचा अजित पवार गटाला इशारा, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी… माझ्या आई आणि बापाचा नाद करायचा नाय

दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेसमधील काका-पुतण्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरून संघर्ष शिगेला पोहोचत चालला आहे. त्यातच आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या गटाच्यावतीने समर्थक आमदार-कर्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी… बाकी कुणावरही बोला पण माझ्या आई आणि बापाचा नाद करायचा नाय, असा इशारा अजित पवार गटाच्या नेत्यांना दिला. पवारसाहेबांना सांगतात तुमचं वय झालं, आता थांबा, अरे यांच्यापेक्षा आम्ही मुली बऱ्या, जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा तीच अहिल्या होते आणि ताराराणी होते असे सांगत आगामी संघर्षाला आपण तयार असल्याचे जाहिर केले.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी आधी फार इमोशनल होते. पण काही जणांमुळे माझं मन घट्ट झालंय, असं सांगतानाच आरपारच्या लढाईचे संकेतच अजित पवार यांना दिले.

अजित पवार यांच्या गटाने बांद्र्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात छगन भुजबळ, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी घणाघाती भाषणं करुन जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल चढवला. अजित पवार यांनी तर थेट शरद पवार यांनाच लक्ष्य केलं. या सर्व नेत्यांच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. शरद पवार यांच्या गटाचा मेळावा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला. या मेळाव्याला पक्षाचे १७ आमदार उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, २०१९ ला विपरित परिस्थिती असताना देखील हा ८० वर्षांचा योद्धा लढला. त्यांच्यामुळे पक्षाला चांगले दिवस बघायला मिळाले. त्यांच्यामुळेच पक्ष २०१९ ला सत्तेत आला. पण त्यांनाच आता निवृत्त व्हा, असे काही लोक सांगत आहेत. रतन टाटा अजूनही लढत आहे. अमिताभ अजूनही अॅक्टिंग करत आहेत. पूनावाला अजूनही त्यांच्या उद्योगात लक्ष घालत आहेत. मग पवारांनीच का निवृत्ती घ्यायची? असा सवालही अजित पवार यांना विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीने ७० हजार कोटींचा घोटाळा केला असं म्हटलं. नरेंद्र मोदी हे आधी राष्ट्रवादीला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे. मग आता सवाल आहे त्यांना राष्ट्रवादीची काय गरज पडली? त्यामुळे या देशात सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष हा भाजपा आहे, असा हल्लाबोल करताना त्याच भाजपाविरोधात रस्त्यावरुन उतरुन संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असे आदेशच सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

शरद पवार यांनी घेतला पटेल यांचा समाचार, मलाही उत्सुकता आहे पण ते ईडीचे…

कर्जत येथील अजित पवार गटाच्या मंथन शिबीरात बोलताना शरद पवार यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांच्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *