Breaking News

अजित पवार यांनी जाहिर केले राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच, पवारांच्या बैठकीला कोणीच नव्हते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत केला दावा

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून तीन दिवस होत नाही तोच अजित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडे दाखल केलेल्या याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मीच असून माजी निवड संपू्र्ण पक्षाच्या कार्यकारणीने आणि सदस्यांनी केली असल्याचा दावा अजित पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच शरद पवार यांनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला कोणीही उपस्थित नव्हता असा दावाही त्या याचिकेत केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अर्थात काका-पुतण्यामधील वाद चांगलाच चिघळण्याचे दिसून येत आहे.

अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेत ३० जून २०२३ रोजी राष्ट्रवादीच्या सर्व संघटनात्मक प्रमुखांनी अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केल्याचा दावा केला आहे. तसेच पक्षाच्या घटनेनुसार आणि अध्यक्षांना असलेल्या अधिकारानुसार प्रफुल पटेल यांना यापुढेही कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त राहतील असे स्पष्टपणे नमूद केले. याशिवाय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पदमुक्त केले. याशिवाय जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते पदी करण्यात आलेली निवडही बेकायदेशीर आहे. तरीही या दोघांकडून संभ्रम निर्माण करण्यात येत असल्याने या दोघांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणीही याचिकेमार्फत करण्यात आली आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणताही राष्ट्रीय मेळावा किंवा राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित न करताच शरद पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आला असा आरोपही अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. तसेच पक्षाच्या बहुतांष आमदारांचा आणि संघटनात्मक कार्यकारीणी प्रमुखांचा आपल्यालाच पाठिंबा असून पक्षाचे चिन्ह आणि झेंडा वापरण्याबाबत फक्त आम्हालाच परवानगी देण्यात अशी मागणीही अजित पवार यांनी याचिकेद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली.

दरम्यान, राष्ट्रवादी कोणाची यावरुन अजित पवार आणि शरद पवार गटांकडून दावे प्रतिदावे सुरू आहेत. दोन्ही गटांनी आज मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला ३२, तर शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला १८ आमदार उपस्थित होते. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्लाबोल केला. त्यानंतर आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Check Also

श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *