Breaking News

शरद पवार यांचा तो इशारा आणि बीडमधील धनंजय मुंडे समर्थकांची कबुली त्या बॅनरवरून रंगली चर्चा

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतल्यानंतर उद्या ते बीड येथे स्वाभिमान सभेला संबोधित करणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांचा हा पहिलाच मराठवाडा दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी कामाच्या माणसाला आर्शीवाद द्या अशा वक्तव्याचे आणि शरद पवार, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा फोटो लावले. त्यामुळे या पोस्टरची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली. त्यामुळे अखेर शरद पवार यांनी औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत इशारा देताच मुडे समर्थक कार्यकर्त्यांनी पुढे येत बॅनर लावल्याची कबूली दिली.

बीड शहरातील शरद पवार यांच्या सभेआधीच बॅनर झळकले. या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार यांचे फोटो लावत यातून कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या, अशी भावनिक साध शरद पवारांना घालण्यात आली. उद्या शरद पवार बीडमध्ये सभा घेत असल्याने सभेपूर्वीच हे बॅनर पहायला मिळत आहेत. दरम्यान त्यानंतर आज या कार्यकर्त्यांनी पुढे येत अजित पवार हे शासन प्रशासनावर चांगली पकड ठेवणारे एक नेतृत्व आहे. याच नेतृत्वाला जर शरद पवारांनी साथ दिली तर महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्रासाठी एक चांगलं व्यक्तिमत्व असलेलं तसेच शासन प्रशासनावर पकड असलेलं व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राला मिळेल. यासाठी आम्ही शरद पवारांना भावनिक साद घातल्याचे यावेळेस बीडमधील अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

याचबरोबर उद्या बीडमध्ये शरद पवारांची सभा होत असल्याने अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी आम्ही भव्य सत्कारदेखील आदरणीय शरद पवार यांचा करणार आहोत, असेही माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

मात्र या बॅनरमुळे जी चर्चा जिल्हाभरात सुरू झाली होती, नेमकं हे बॅनर कोणी लावले? यावर आता पडदा पडला आहे. कार्यकर्त्यांनी आम्ही बॅनर का लावले याचे स्पष्टीकरण देत माध्यमांशी संवाद साधल्याने नेमकं कारण काय होतं? यामध्ये अजित पवारांसाठी शरद पवारांना आम्ही भावनिक साध घातली असल्याचे यावेळेस कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, यापूर्वीही शरद पवार यांनी माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नका अशी सूचना अजित पवार गटाला केली होती. मात्र तरीही अजित पवार गटाकडून शरद पवार यांचे फोटो वापरणे तसेच सुरु ठेवले. अखेर आज औरंगाबादेत शरद पवार यांनी माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरल्यास आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा अजित पवार गटाला दिला. कदाचित या इशाऱ्यामुळेच मुंडे समर्थक कार्यकर्ते पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

चहापानावर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्काराची कारण मिमांसा वाचली का?

उद्या सोमवारपासून राज्यातील अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचा अर्थसंकल्प जरी सादर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *